अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी खासदार महुआ मोईत्रायांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. मोईत्रा विरुद्ध ईडीने कारवाई केल्याची दुसरी घटना आहे, पहिली घटना परकीय चलन उल्लंघन प्रकरणातील विसंगतीशी संबंधित आहे. तर दुसरा गुन्हा रोख रकमेच्या चौकशीसाठी मनी लाँड्रिंग प्रकरणी आहे. मोईत्रा यांना ईडीने या आधी तीन समन्स बजावले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत. भारतीय जनता पार्टी (भाजप) लोकसभा सदस्य निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण पुढे आले आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)