अविवाहित जोडप्यांनी हॉटेलच्या खोलीत एकत्र राहणे अपराध नाही-मद्रास हायकोर्ट
फोटो सौजन्य - गुगल

काही वेळेस अविवाहितांना एखाद्या हॉटेलच्या खोलीत एकत्र राहण्याची परवानगी नसते. त्यामुळे अशा वेळी अविवाहितांची राहण्याची गैरसोय होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळेच मद्रास हायकोर्टाने लिव्ह इन रिलेशन मध्ये राहणाऱ्यांना हॉटेलच्या खोलीत एकत्र राहणे हा अपराध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत हे कोणत्याही प्रकारचे अपराधी वागणे नसल्याचे ही हायकोर्टाने सांगितले आहे. न्यायमूर्ती एमएस रमेश यांनी नुकताच आदेश दिला आहे की, याबाबत प्रत्यक्ष असा कोणताही नियम नाही आहे जे अविवाहितांना हॉटेलच्या खोलीत एकत्र राहण्यास बंदी आहे.

तर कोयबंटूर येथील भाड्याने देण्यात येणाऱ्या अपार्टमेंटवरील सील काढून टाकण्याचे हायकोर्टाने निर्देशन दिले आहेत. या अपार्टमेंटवर पोलिस आणि महसूल विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर हे अपार्टमेंट सील करण्यात आले होते. मात्र या प्रकरणी पोलिसांनी असे सांगितले होते की, या अपार्टमेंटमध्ये अनैतिक गोष्टी घडल्या जातात. छापेमारी केल्यानंतर एका खोलीत एक अविवाहित जोडप होतो आणि त्यांच्याकडे दारुच्या काही बाटल्या सापडल्या होत्या. मात्र सील करण्याचा निर्णय हा कायद्याच्या विरोधात असल्याचा निर्णय न्यायाधीशांकडून स्पष्ट करण्यात आला आहे.(बलात्कार करणाऱ्या दोषीला जगातील 'या' देशात आहेत कठोर शिक्षा; पाहा काय आहे शिक्षेचं स्वरूप)

तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये असणारे शारिरीक संबंध म्हणजे बलात्कार नव्हे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तर बलात्कार आणि एकमेकांमधील शारिरीक संबंध या परस्पर विरोधी भावना आहेत. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयाने पूर्णपणे सतर्क राहून त्या प्रकरणी पुरेशी माहिती मिळवणे अनिवार्य आहे. त्याचसोबत तक्रारकर्ता खरच पीडित व्यक्तीसोबत लग्न करु इच्छितो की नाही किंवा त्याने फक्त शारिरीक संबंध ठेवून फसवले असल्याची सुद्धा पारख कोर्टाने करावी.