Representational Image (File Photo)

Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने तिच्या पतीच्या कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर चाकूने भोसकून हत्या केली, तर मध्यस्थी करण्यासाठी आलेली महिला जखमी झाली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रोफेसर कॉलनीत बुधवारी झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शिखा मिश्रा (35) हिला गुरुवारी अटक केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) आनंद कलादगी यांनी सांगितले की, पीडित अनिका (३३) ही आरोपी महिलेचा पती ब्रजेश मिश्रा याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करायची. त्यांनी सांगितले की, शिखाला तिच्या पतीचे अनिकासोबत अफेअर असल्याचा संशय होता. हे देखील वाचा: Fire at Kolkata Slum: पूर्व कोलकाता येथील टोप्सिया भागातील झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने बुधवारी अनिकाशी संपर्क साधला आणि प्रोफेसर कॉलनीतील सोनम रजक नावाच्या महिलेच्या घरी तिची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि शिखाने अनिकावर चाकूने वार केले आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताना सोनमही जखमी झाली. त्यांनी सांगितले की, अनिकाचा मृत्यू झाला, तर सोनम रुग्णालयात दाखल आहे. एएसपी म्हणाले की, घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपी महिलेला गुरुवारी सतना रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली.