Fire at Kolkata Slum: पूर्व कोलकाता येथील टोप्सिया भागातील (Topsia Area) झोपडपट्टी (Slum) ला शुक्रवारी दुपारी भीषण आग (Fire) लागली. या आगीत सुमारे 150 घरे असलेल्या झोपडपट्टीचा मोठा भाग जळून खाक झाला. ईस्टर्न मेट्रोपॉलिटन बायपास ( Eastern Metropolitan Bypass) ला लागून असलेल्या डीएन डे रोडवरील (DN Dey Road) झोपडपट्टीत दुपारी 12.50 च्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण -
या घटनेत आतापर्यंत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. दुपारी 2.10 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले. झोपडपट्टीला आग लागल्याने आकाशात धुराचे लोट दिसत होते. कोरड्या वाऱ्यामुळे आग आणखी भडकली. गजबजलेल्या भागामुळे अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचू शकल्या नाहीत आणि वाहनांना आगीजवळ जाण्यासाठी मार्ग काढावा लागला.(हेही वाचा -Fire At Shop In Bavdhan: बावधन परिसरातील शिंदे नगर येथील एका दुकानाला भीषण आग, पहा व्हिडिओ)
आगीच्या घटनेत कोणतीही दुखापत नाही -
दरम्यान, अपघातस्थळी स्थानिक अग्निशमन दलाला आग विझवण्यास मदत करताना दिसले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आग पाहता जवळच्या उंच इमारतीतून लोकांना बाहेर काढण्यात आले. शेवटची माहिती मिळेपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
कोलकाता येथील टोप्सिया भागातील झोपडपट्टीला भीषण आग -
#WATCH | West Bengal | Fire breaks out in a slum cluster in Topsia area of Kolkata, 15 fire tenders on the spot pic.twitter.com/TlW1tFupKD
— ANI (@ANI) December 20, 2024
घटनास्थळी पोहोचलेले राज्याचे अग्निशमन सेवा मंत्री सुजित बसू यांनी म्हटलं की, मी सर्व रहिवाशांना शांत राहण्याचे आवाहन करतो. त्यांच्या रागाची कारणे असू शकतात. पण सध्या आग विझवायची आहे. मी 15 फायर इंजिनांना बोलावले होते आणि पोलिसांना रस्ता मोकळा ठेवण्यास सांगितले होते. जेणेकरुन त्यांच्या येण्यास उशीर होऊ नये. तथापी, झोपडपट्टीच्या जळालेल्या अवशेषांपासून बचाव आणि मदत कार्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन कर्मचारीही तैनात करण्यात आले होते.