building

Madhya Pradesh News:  मध्य प्रदेशातील इंदौर येथील पलासिया पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून महिला जखमी झाली आहे. महिलेला पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रथमदर्शीनी असे सांगितले की, महिला बाल्कनीत कपडे काढताना, ती चुकून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडली. (हेही वाचा- खेळता खेळता मुलाचा तोल गेला अन् मेट्रो रुळावर पडला)

मिळालेल्या माहितीनुसार, तुलसी लुडेले असं या महिलेचे नाव आहे, ती बडी ग्वालटोली येथील रहिवासी आहे. तिने दोन महिन्यांपूर्वी विकि लुडले यांच्याशी लग्न केले. काल दुपारी महिला बाल्कनीत कपडे काढत असताना ही घटना घडली. तिचा पाय घसरला आणि ती थेट खाली पडली असं परिसरातील प्रथमदर्शीनी सांगितले. पडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान तिने इमारतीवरून उडी मारल्याचे ही परिसरात बोलले जात आहे.

या घटनेचा तपास पोलिस करत आहे. महिले दुसऱ्या मजल्यावरून कशी पडली याचा शोध घेण्यात येणार आहे. पोलिस या संदर्भात चौकशी देखील करणार आहे. महिला माहेरी आली होती तेव्हा ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.