Madhya Pradesh crime: जबलपूरमधील खळबळजनक घटना, क्षुल्लक कारणावरून भाजप कार्यकर्त्याची आणि मित्रांची गोळी झाडून हत्या
Murder | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Madhya Pradesh crime:  मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका भाजप कार्यकर्त्याची आणि त्याच्या साथीदाराची गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी या घटनेची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे. जबलपूरमधील पाटणा येथे शुक्रवारी हत्या केली. हत्या करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस आरोपींचा शोध घेत माहिती मिळाली. ( हेही वाचा-  इंस्टाग्राम वरील मैत्री 21 वर्षीय तरूणीसाठी ठरला 'Traumatic Experience'; )

मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरच्या पाटण भागात शुक्रवारी रात्री किरकोळ वादातून आरोपींनी गोळ्या झाडून दोघांची हत्या केली. आरोपी गोळी झाडून घटनास्थळावरून फरार झाले. पाटणच्या वॉर्ड क्रमांत ३ मधील चौधरी वस्तीत भाजप नेते आशिष बहोरे हे त्यांचे साथीदार पप्पून बर्मन आणि अन्य तिघांसह नंदेसरिया सोबत होते. बोलत असताना यांच्याशी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. आरोपीने बंदूक काढून नंदेसरिया आणि आशिष यांच्या दोघांवर हल्ला केला. रक्तबंबाळ झालेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, गुन्हा दाखल केला.  पोलिसांनी पथक नेमुन आरोपींचा शोध सुरू केला आहे. चौकशीतून, आशिष बहोरे यांच्या फेसबुक प्रोफाइलवरून तो भारतीय जनता पक्षाचा (भाजप) सदस्य असल्याचे उघड झाले आहे.