Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशात कार डिव्हाडरला धडकून भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू
Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील इंदौर येथे शनिवारी भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. तेजाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार उलटून अपघात झाला. या अपघातात एका आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आणि त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. रालामंडळजवळ बायपास रोडवर पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे.  (हेही वाचा- कारची अवजड वाहनाला धडक,समृध्दी महामार्गावर तिघांचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाच्या हेडलाईट डोळ्यात गेल्यामुळे कार अनियंत्रित झाल्याने डिव्हायडरला धडक दिली. कार दोन वेळा पटली होऊन शेतात पडली. कौस्तुभ लांबे असे मृताचे नाव होते. तो टिळक नगर परिसरातील साईनाथ कॉलनीत राहणारा आहे. तो एका आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता आणि सिलीकॉन सिटीमध्ये राहणारा त्याचा मित्र प्रशांत दीक्षित याच्यासोबत कंपनीच्या पार्टीतून परतत होता. अपघात झाला तेव्हा कौस्तुभ गाडी चालवत होता अशी माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती टिळक नगर पोलिसांना देण्यात आली. अपघातस्थळी पोलिस आले आणि दोघांनाही रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन गेले.

या घटनेत कारचा चक्काचूर झाला आहे. अपघात इतका भयंकर होता की, कारने दोन वेळा पटली घेतली. पोलिसांनी कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी घेऊन गेले आहे. या अपघातानंतर कौस्तुभच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. कौस्तुभ हा त्याचा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.