Samruddhi Mahamarg, Accident (PC - ANI/File Photo)

Samriddhi Highway Accident:  समृध्दी महामार्गावर काल एक भीषण अपघात झाला होता. तर आज पुन्हा अपघात झाला आहे. संभाजीनगरच्या दौलताबादजवळ असलेल्या समृध्दी महामार्गावर कारचा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री 11 वाजता हा अपघात घडून आला. अनियत्रिंत कारने अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिली. अपघातात धडक इतक्या जोरात होती की, कारचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. (हेही वाचा-  समृद्धी महामार्गावरील अपघातात तीन ठार, दोन गंभीर जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल आनंद निकम (वय 47 द्वारकानगर हडको) शिवाजी वामनराव थोरात (वय वर्ष 58, द्वारकानगर ) आणि अण्णा रामराव मालोदे  (वय 71 नवजीवन कॉलनी, हडको एन 11) अशी या अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहे. शुक्रवारी रात्री वैजापूरजवळ समृध्दी महामार्गावर अपघात झाला होता आणि त्यात देखील तीन जण ठार झाले. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री पुन्हा अपघात झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संभाजीनगर येथील प्रवाशी कारने नाशिककडे जात होते. दौलताबादजवळील माळीवाडा इंटरचेंजजवळ त्यांच्या कारने अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिली. या भीषण धडकेत अपघात घडून आला.

अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघाताची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. माहिती मिळताच, रुग्णावाहिका अपघातस्थळी आली आणि मृतांना घाटी रुग्णालयात दाखल करू घेतले. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी थोड्यावेळाने वाहतूक सेवा सुरळीत केली. अपघातग्रस्त कार क्रेनच्या मदतीने उचलण्यात आली.