मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छतरपूर जिल्ह्यातून (Chhatarpur District) रविवारी (11 जुलै) सकाळी एक वेदनादायक घटना उघडकीस आली आहे. या जिल्ह्यातील एका खेड्या गावात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्हा मुख्यालायापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिजावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महुआ झाला गावात (Mahua Jhala Village) घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टॉयलेटसाठी सेप्टिक टँकच्या बांधकामादरम्यान एका व्यक्तीला विजेचा धक्का लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील 5 जणांचाही दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बिजावर पोलिस स्टेशनचे प्रभारी मुकेशसिंग ठाकूर यांनी सांगितले की, महुआ झाला गावात शौचालय बांधले जात आहे. यासाठी सेप्टिक टाकी बनविली गेली आणि त्यावर एक छप्परवर दिवे लावण्यात आले होते. हे हटवण्यासाठी एक व्यक्ती सेप्टिक टाकीमध्ये खाली उतरला. याचदरम्यान, त्याला विजेचा धक्का लागला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचाही विजेच्या धक्का लागला. या घटनेनंतर बाकीच्या कुटुंबियांनी तातडीने सर्वांना आरोग्य केंद्रात नेले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण अहिरवार (वय, 65), शंकर अहिरवार (वय, 35), राम प्रसाद (वय, 32), मिलान अहिरवार (वय, 28), नरेंद्र आहिरवार (वय, 25) विजय अहिवार (वय, 20) अशी मृतांची नावे आहेत. हे देखील वाचा- Chengalpattu: अल्पवयीन मुलीला अश्लील मॅसेज पाठवल्याप्रकरणी सरकारी बस कंडक्टरला अटक
याबाबत पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाकूर यांनी सांगितले की, या संदर्भात गुन्हा नोंदवून सखोल चौकशी सुरू आहे. येथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महुआ झाला गावात झालेल्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या घटनेत मरण पावलेल्या लोकांच्या आत्म्यास शांती लाभो. तसेच कुटुंबातील सदस्यांना हे दु:ख सहन करण्यासाठी सामर्थ्य मिळण्याची प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे.