Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Lucknow Shocker:  उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील (Lucknow)बीबीडी विद्यापीठातील 23 वर्षीय विद्यार्थिनीचा दयाल रेसिडेन्सीमध्ये रात्री गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रात्री उशिरा पार्टी चालू असताना गोळी लागल्याने मृत्यू झाला. गुरुवार, 21 सप्टेंबर रोजी पहाटे 3.30 च्या सुमारास चिन्हाट परिसरात ही घटना घडली. या घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मित्राच्या बोलवण्यावरून लखनऊच्या चिन्हाट परिसरातील दयाल रेसिडेन्सीमध्ये गेली होती. ही घटना रात्री उशीरा अपार्टमेंटमध्ये पार्टी सुरु असताना झाली. पोलीसांनी फ्लॅटमधून दारूच्या बाटल्याही जप्त केल्या. हा गोळीबार आकस्मिकपणे झाला होता की कटाचा भाग म्हणून गोळीबार करण्यात आला होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. निष्ठा त्रिपाठी असं मृत तरुणीचे नाव आहे. या पार्टीत इतर विद्यार्थी देखील उपस्थित होते.

गोळीबार झाल्यानंतर तीला जवळच्या लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. पोलीसांनी या घटने अंतर्गत तरूणीचा मित्र आदित्य पाठक ह्याला ताब्यात घेतले आहे.  याप्रकरणी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपस्थित असलेल्या इतर लोकांची देखील चौकशी करत आहेत. पोलीसांनी तरुणीत्या कुटूंबियांनी या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस कायदेशीर कारवाई करतील अशी माहिती पोलीसांनी दिली आहे,