Lucknow News: कुत्र्याला रॉडने बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, लखनऊ येथील घटना
attack on dog PC Twitter

Lucknow News: एका भटक्या कुत्र्याला लोखंडी रॉडने बेदम मारून त्याचा पाय मोडल्याप्रकरणी एका जोडप्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लखनऊ येथील इंदिरा नगर परिसरातील आहे. ही घटना रविवारी घडली असून या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या वसाहतीतील भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या विजयकुमार उपाध्याय या स्थानिक रहिवाशाच्या तक्रारीवरून सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा- रायबरेली येथे तरुणांनी केला जीवघेणा स्‍टन्‍ट, चालत्या कारमध्ये बनवले रिल्स)

मिळालेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारीच्या रात्री पती आणि पत्नी दोघेही लोखंडी रॉड घेऊन कुत्र्याचा पाठलाग करत होते.  दरम्यान एका कुत्र्यावर हल्ला केला. त्यांनी लोखंडी रॉडने एका पायाला बेदम मारहाण केली. त्यामुळे कुत्र्याच्या पायाला अनेक फ्रॅक्चर झाले. ते शिविगाळ करत होते आणि कॉलनीत कुत्रे आढळल्यास सर्वांना मारून टाकेन अशी धमकी दिली. अभय शुक्ला असं आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी तक्रारदाराने पोलिस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. तक्रारकर्त्याने आरोप केला आहे की, पोलिसांननी यावर कडक कारवाई करावी. जखमी कुत्र्याचे वैद्यकिय बिल आरोपींनी भरावे अशी मागणी तक्रारदाराने केली. पोलिसांनी तक्रार दाखल करत दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी IPC 429 (प्राण्यांना मारणे किंवा अपंग करणे) 506 (गुन्हेगारी धमकी) आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस  या प्रकरणी तपास करत आहेत. घटनास्थळाचे सीसीटीव्ही स्कॅन करण्यात येत आहेत.