खुशखबर! मोदी सरकारची जनतेला मोठी भेट; घरगुती LPG गॅस सिलेंडर ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवे दर
LPG Cylinders | Representative Image | (Photo Credits: ANI)

मोदी सरकार (Modi Government) ने रविवारी जनतेला एक खुशखबरी दिली आहे. प्रत्येक कुटुंबाची लाईफलाईन म्हणजेच, घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) च्या किंमतीमध्ये अतिशय घट करण्यात आली आहे. विना अनुदानित (Non-Subsidised) सिलेंडरची किंमत तब्बल 100.50 रुपये प्रति सिलेंडरने कमी झाली आहे. आज मध्यरात्रीपासून म्हणजेच, एक जुलै पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. आता दिल्ली मध्ये घरगुती वापराचा सिलेंडर 637 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तेल कंपन्यांनी ही माहिती दिली आहे. तसेच सबसिडीयुक्त (Subsidised) घरगुती सिलेंडरची किंमतही 100.50 रुपयांनी कमी झाली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इंडियन ऑयल कॉपोर्रेशनचे (Indian Oil Corporation) रविवारी एक पत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत कमी झाली असल्याने तसेच डॉलर-रुपया विनिमय दरांत बदल घडल्याने एलपीजी सिलेंडर (14.2 किलो) च्या किमतीमध्ये घट झाली आहे. आता सबसिडीयुक्त एलपीजी सिलेंडर घेताना ग्राहक नवीन दरानुसार याचे मूल्य चुकते करतील.

(हेही वाचा: आता अन्नधान्यांंच्या किंमती वाढल्या, तुरडाळ झाली 120 रु. किलो; गेल्या 7 महिन्यांतली सर्वात जास्त महागाई)

दरम्यान, ग्राहकांना एका वर्षात 12 सबसिडीयुक्त सिलेंडर मिळतात. त्यात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत अचानक घट झाल्यानंतर, ग्राहकांना 142.65 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे जुलै 2019 पासून नवीन  दराने सिलिंडरची किंमत 494.35 रुपये असणार आहेत.