प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

कोरोना विषाणूवर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशाभरात संचारबंदीची (Lockdown) घोषणा केली होती. यामुळे जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकानेही बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, मद्य मिळत नसल्याने त्यांनी चक्क पेंट वार्निशचे (Paint Varnishes) सेवन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना तमिळनाडूतील (Tamilnadu) चेंगलपट्टू (Chengalpattu) येथे घडली आहे. त्यानंतर त्यांना उलट्या सुरू झाल्या. या त्रासानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाल्यापासून तळरामांची मोठी पंचाईत झाल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी मद्याची दुकाने फोडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे दुकानाच्या मालकांना त्यांच्या दुकानासमोर सुरक्षा रक्षक नेमण्याची वेळ आली आहे.

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, यामुळे जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकानंही बंद ठेवण्यात आली आहे. यातच तमिळनाडू येथे घडलेल्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यात कुठेही दारूचे दुकान नसल्याने 3 जणांनी चक्क पेंट वार्निशचे पाण्यात मिसळून त्यांचे सेवन केले. त्यानंतर तिघांना उलट्या सुरु झाल्याने त्यांना चेंगलपट्टू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार दरम्यान तिघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तामिळनाडूत घडलेली ही दुसरी घटना आहे. सॉफ्ट ड्रिंकमध्ये शेव्हिंग लोशन मिक्स करून प्यायल्यानं तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली होती. हे देखील वाचा- कोरोना व्हायरस विरोधातील लढ्यासाठी भारतीय रेल्वेने तयार केलं स्वस्त व्हेंटिलेटर ‘जीवन’; जाणून घ्या किंमत

याआधी दारू मिळत नसल्याने केरळ राज्यात 5 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यामुळे घटनेने संपूर्ण देश हादरून गेले होते. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी त्यांच्या राज्यात दारु संदर्भात मोठी घोषणा केली होती. त्यानंतर केरळमधील काही भागात दारूची विक्रीला सुरुवात केली गेली.