Lockdown: लॉकडाउन आणखी वाढणार की संपणार? पाहा काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credit: IANS)

कोरोना विषाणूचे (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनची (Lockdown) घोषणा केली होती. या कालावधीत नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता कोणीतीही सुविधा मिळत नाही. यामुळे लॉकडाउन वाढणार की, संपणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात फिरत आहेत. नुकतीच नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनसंदर्भात भाष्य केले आहे. येत्या 14 एप्रिलनंतर लॉकडाउन वाढवला जाणार नाही, असे सांगत तूर्तास तरी मोदींनी लॉकडाउन संपेल असे संकेत दिले आहेत. तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर आवश्यक धोरण आखणे अधिक गरजेचे आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

नुकतीच नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी 144 एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेला लॉकडाउन न वाढवण्याचे संकेत दिले आहेत. लॉकडाउनच्या काळातले निर्बंध सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच लॉकडाउन संपल्यानंतर आवश्यक धोरण आखणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. लॉकडाउन संपल्यानंतर 10 मुख्य निर्णयांसह तयार रहा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र्यांना म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी 21 दिवसांकरिता संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला होता. या कालावधीत हातावरचे पोट भरणाऱ्यांचे कामगार रस्त्यावर आले आहेत. त्यांच्यासाठी सरकार उपाय योजना करताना दिसत आहे. हे देखील वाचा- Lockdown: कल्याण- डोंबिवलीत उद्यापासून भाजीपाला, किराणा दुकानांसह डेअरीही राहणार बंद; पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश

एएनआयचे ट्वीट- 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे लावून कोरोनाच्या संकटात आपली एकी दाखवून देण्याचे आवाहन केले. या प्रत्येकाने आपल्या खिडकीत, दारात दिवे लावून त्याचे नाके फोटो व्हिडीओ सुद्धा शेअर केले. नरेंद्र मोदी यांची दिये जलाओ अभियानाची घोषणा ब्राझील मधील रहिवाशांनी सुद्धा पाळली आणि त्यांनी सुद्धा आपल्या घराबाहेर येऊन मोबाईलचे फ्लॅशलाईट्स, मेणबत्त्या पेटवल्याची माहिती समोर आली आहे.