Wife Stabs Husband In His Eyes With Scissor: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बागपत (Baghpat) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बायकोच्या फोनवर गाणी ऐकणे पतीला चांगलचं महागात पडलं आहे. संतापलेल्या पत्नीने घरात ठेवलेल्या कात्रीने (Scissor) पतीच्या डोळ्यावर वार केले. त्यामुळे पतीच्या डोळ्यांना दुखापत झाली आहे. हे संपूर्ण प्रकरण कोतवाली बरौत परिसरातील आहे. प्राप्त माहितीनुसार, अंकित नावाचा तरुण आपल्या पत्नीच्या मोबाईलवर यूट्यूब प्ले करून गाणे ऐकत होता. दरम्यान, पत्नीची नजर त्याच्यावर पडली आणि तिने पतीकडे मोबाईल मागितला. मात्र अंकितने गाणे ऐकून मोबाईल परत करेल असे सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि वाद वाढत गेला.
त्यानंतर तिने पतीच्या डोळ्यावर कात्रीने वार केले. अंकितच्या म्हणण्यानुसार, तिला मोबाईल फोन दिला नाही म्हणून राग आला आणि तिने घरात ठेवलेली कात्री उचलून डोळ्यावर वार केले. पतीच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे पाहून तिने घटनास्थळावरून पळ काढला. कुटुंबीयांच्या मदतीने जखमी तरुणाला सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडत असल्याचे पाहून सीएचसीमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मेरठला रेफर करण्यात आले. (हेही वाचा - UP Shocker: कारमध्ये लिफ्ट दिल्यानंतर महिलेवर सामुहिक बलात्कार, चार आरोपी अटकेत, बाराबंकीतील घटना)
तीन वर्षांपूर्वी लग्न, दीड वर्षापासून भांडण -
अंकितच्या म्हणण्यानुसार, रामाळा पोलीस स्टेशन हद्दीतील सूप गावातील एका मुलीशी तीन वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. लग्नाच्या दीड वर्षापर्यंत त्यांच्यात सर्व काही ठीक चालले होते. मात्र दीड वर्षांपासून दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद सुरू होता. या वादामुळे पत्नी अनेकवेळा माहेरी गेली आहे. (हेही वाचा- व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठविणाऱ्यास महिलांकडून चोप (पाहा व्हिडिओ)
#BreakingNews | पत्नी के फ़ोन में गाने सुनना पति को पड़ा भारी
पत्नी ने कैची से हमला कर फोड़ी पति की आंख
3साल पहले हुई थी शादी
आरोपी पत्नी मौके से हुई फरार
बड़ौत कोतवाली क्षेत्र का मामला
Watch : https://t.co/VgMudtKQLU#UttarPradesh #Crime #Baghpat #Bharat24Digital… pic.twitter.com/4x2NCRiTrF
— Bharat 24 - Vision Of New India (@Bharat24Liv) December 28, 2023
दाम्पत्यात मोबाईलवरून वाद होण्यापूर्वी चहावरून वाद झाला होता. अंकितने सकाळी उठून बेडवर पत्नीकडे चहाची मागणी केली. जे देण्यास पत्नीने नकार दिला होता. यावरून दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. या कारणावरून दोघांमध्ये तासनतास वाद सुरू होता. ज्याची किंमत अंकितला गाणे ऐकताना मोजावी लागली.