Telangana electric shock PC TWITTER

Telangana News: तेलंगणातील (Telangana) संगारेड्डी जिल्ह्यात विजेच्या खांबावर काम असताना शॉक (Electric Shock) लागून एका लाईनमनचा मृत्यू झाला. ही घटना फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू झाला हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. इतर लोक त्याचा मृतदेह खांबावरून खाली आणताना दिसत आहेत. हेही वाचा- Google Maps वापरून रस्ता शोधताना पर्यटकांचे वाहन पुराच्या पाण्यात; केरळ राज्यातील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, संगारेड्डी जिल्ह्यातील मल्लिकार्जुनपल्ली, मुनिपल्ली मंडल येथे ही घटना घडली. शुक्रवारी २४ मे रोजी या घडना घडली. बलराजू (24) असे मृताचे नाव आहे.  तो संगारेड्डी टाऊनमधील किंडा बाजार येथील रहिवासी होता. बालराजू नुकतेच या विभागात लाइनमन म्हणून रुजू झाला होता. परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने बलराजू विद्युत खांबावर चढला होता परंतु त्याला विजेचा शॉक लागला.

अचानक मोठा शॉक लागल्याने त्याला जीव गमवावा लागला. बालराजूला विजेचा धक्का लागला याची माहिती गावकऱ्यांना मिळताच, विजेच्या खांबा जवळ गर्दी केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून तपास सुरू केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या घटनेमुळे परिसरात दुखाचे वातावरण निर्माण झाले होते.