व्होडाफोन-आयडियाच्या स्थितीमुळे कुमारमंगलम बिर्ला यांच्या संपत्तीत 22 हजार कोटी रुपयांची घट
Kumar Mangalam Birla (PC- PTI)

रिलायन्स जिओ (Reliance Gio)बारपेठेत आल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रातील अनेक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तर अनेक कंपन्यानी जिओला टक्कर देण्यासाठी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या स्वरुपाच्या ऑफर दिल्या. मात्र, या ऑफरमुळे काही कंपन्या डबघाईला आल्या. सध्या आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) या दोन कंपन्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे कंपनीचे मालक कुमारमंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. व्होडाफोन-आयडियाच्या स्थितीमुळे बिर्ला यांच्या संपत्तीत 22 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. 2016 मध्ये रिलायन्स जिओ बाजारपेठेत आल्यानंतर अनेक कंपन्यांना आपल्या ऑफर बदलली तर काहींनी आपली कंपनी दुसऱ्या कंपनीस विकली. गेल्या वर्षी आयडियाने ब्रिटिश दूरसंचार कंपनी व्होडाफोनसोबत हातमिळवणी केली होती. त्यामुळे या कंपन्याच्या आर्थित स्थितीमुळे बिर्लांच्या संपत्तीत 2017 पासून आतापर्यंत एक तृतीयांश घट झाली, असे ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा - Vodafone Idea ची दिवाळखोरीकडे वाटचाल; व्होडाफोन सीईओ Nick Read यांनी मागितली पीएम नरेंद्र मोदींची माफी

सध्या बिर्ला यांच्या विविध क्षेत्रातील समभागांची किंमत घसरत आहे. विशेष म्हणजे रसायन, धातू व सिमेंट क्षेत्रातील कंपन्याही मंदीच्या सावटाखाली आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, दोन वर्षांपूर्वी बिर्लांची संपत्ती 910 कोटी डॉलर होती. परंतु, यात घट होऊन आता ती 600 कोटी डॉलर झाली आहे. सध्या बिर्ला यांच्या संपत्तीत 22 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाला आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत तब्बल 50,922 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे कंपनीचा तिमाही तोटा हा भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात मोठे नुकसान आहे. यापूर्वी, टाटा मोटर्सला 2018 च्या डिसेंबर तिमाहीत 26,961 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.