Reliance Jio मध्ये KKR ची 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक, एका महिन्यात जिओ प्लॅटफॉर्मची पाचवी मोठी डील
Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

खाजगी इक्विटी कंपनी केकेआर (KKR) 2-32 क्के भागभांडवलासाठी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये (Jio Platforms) 11,367 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) शुक्रवारी जाहीर केले. गेल्या महिन्यात तेल-रिटेल (Oil Retail) ते दूरसंचार समूह यांच्यानंतर जिओचा हा पाचवा मोठा करार आहे. केकेआरने जिओ प्लॅटफॉर्मची इक्विटी व्हॅल्यू 4.91 लाख कोटी रुपये ठेवली आहे. गुंतवणूकदारांकडून एकूण 78,562 कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. फेसबुक (Facebook) इन्व्हेस्टमेंट ही पहिली गुंतवणूक होती. त्यानंतर सिल्व्हर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स आणि जनरल अँटालॅंटिक यांनी गुंतवणूक केली होती. आशिया खंडातील केकेआरची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, “जगातील सर्वात प्रतिष्ठित आर्थिक गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या केकेआरचे एक महत्त्वाचे भागीदार म्हणून स्वागत केल्याने मला आनंद झाला." (Reliance Jio मध्ये Facebook करणार 43,574 कोटींची मोठी गुंतवणूक; Global Pandemic च्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय)

"केकेआर हा भारतीय डिजिटल इको सिस्टीममधील बदलाच्या आमच्या प्रवासात भागीदार असेल. हे सर्व भारतीयांसाठी फायदेशीर ठरेल. भारतात प्रिमियर डिजिटल सोसायटी बनवण्याचे आमचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य केकेआर शेअर करते. केकेआरचा महत्त्वपूर्ण भागीदार होण्याचा ट्रॅक रेकॉर्ड विलक्षण आहे. आम्हाला आशा आहे की जिओला पुढे नेण्यासाठी केकेआरचे जागतिक व्यासपीठ, उद्योग अंतर्दृष्टी आणि ऑपरेशनल कौशल्याचा फायदा होईल."

याआधी, 18 मे रोजी जनरल अटलांटिकने 6,598.38 कोटी रुपयांमध्ये जिओ प्लॅटफॉर्ममधील 1.34 टक्के भाग खरेदी करणार असल्याचे सांगितले, तर व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सनी 8 मे रोजी सांगितले की ते 11,367 कोटी रुपयांमध्ये 2.32 टक्के भागभांडवल घेणार आहे. त्याआधी अमेरिकेची खाजगी इक्विटी फर्म सिल्व्हर लेक जियो प्लॅटफॉर्मवर 1.15 टक्के भागभांडारासाठी 5,655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले होते. 9.9 टक्के भागभांडवलासहफेसबुकने7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले.