Kozhikode Plane Crash: केरळच्या कोझिकोडमधील विमान दुर्घटनेदरम्यान बचाव कार्य करणाऱ्या 22 जणांना कोरोना विषाणूची लागण
Kozhikode Plane Crash (PC - Twitter)

Kozhikode Plane Crash: केरळच्या कोझिकोडमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेदरम्यान बचाव कार्य करणाऱ्या 22 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यासंदर्भात मलप्पुरमच्या आरोग्य अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. यात स्थानिक पोलीस अधिकारी आणि जिल्ह्याच्या आयुक्तांचादेखील समावेश आहे.

दरम्यान, दुर्घटनेत वाचवण्यात आलेल्या 2 प्रवाशांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या प्रवाशांना बाहेर काढणाऱ्या सीआयएसएफच्या 30 अधिकाऱ्यांना शनिवारी 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं होतं. (हेही वाचा - Amit Shah Tests COVID 19 Negative: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोनामुक्त; पुढील काही दिवस होम आयसोलेशन)

प्राप्त माहितीनुसार, विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह होता. तसेच आणखी एका प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे बचावकार्यातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. (हेही वाचा - Bihar Assembly Election 2020: देवेंद्र फडणवीस यांना बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता)

मागील आठवड्यात केरळच्या वंदे भारत मिशनअंतर्गत दुबईहून येणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाचा अपघात झाला होता. हे विमान लॉकडाऊनमुळे दुबईत अडकलेल्या नागरिकांना भारतात घेऊन येत होतं. या विमानात एकूण 190 प्रवासी होते. दुर्घटनाग्रस्त विमान लँडिंग करताना रनवेवरुन घसरले होते. या दुर्घटनेत एका पायलटसह 19 जणांचा मृत्यू झाला होता.