Kedarnath | Twitter

Kedarnath Rescue: उत्तराखंडच्या केदारनाथ धाम यात्रा मार्गावर बचाव आणि शोध मोहीम पाचव्या दिवशीही सुरू आहे. एनडीआरएफ, हवाई दल आणि स्थानिक पोलीस अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. बचावकार्यात एनडीआरएफचे पथक स्नायपर कुत्र्यांचीही मदत घेत आहेत. याद्वारे त्यांनी लिंचोली ते रामबाडापर्यंतचा परिसर व्यापला आहे. आता रामबाडा ते भिंबळीपर्यंत शोधमोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी केदारनाथ धाम येथून 100 लोकांना लिंचोली येथे पाठवण्यात आले, तेथून त्यांना हवाई मार्गाने सुरक्षित स्थळी नेण्यात येणार आहे. यामध्ये भाविकांसह स्थानिक लोक आणि मजुरांचाही समावेश आहे. दरम्यान, रामबारा चौमासी चालण्याच्या मार्गावर अडकलेल्या 110 प्रवाशांचीही सुटका करून त्यांना चौमासी येथे नेण्यात आले आहे. आतापर्यंत या मार्गावरून ५३४ हून अधिक प्रवासी आणि स्थानिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. हे देखील वाचा: Pooja Khedkar Case: पूजा खेडकरची UPSC च्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव; IAS पद परत मिळवण्यासाठी देणार कायदेशीर लढा

केदारनाथमध्ये पाचव्या दिवशीही बचावकार्य सुरूच 

बुधवारी रात्री ढगफुटीमुळे केदारनाथ पायी मार्गावरील लिंचोली, भिंबळी, घोडापाडव आणि रामबाडा यासह अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले. इतर ठिकाणी दरड कोसळल्याने आणि डोंगरावरून मोठमोठे दगड आल्याने रस्ता खराब झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी भाविक अडकले. अडकलेल्या भाविकांच्या सुटकेसाठी गुरुवारी सकाळपासून जमीन आणि हवाई मार्गाने बचावकार्य सुरू आहे. भारतीय हवाई दलाचे चिनूक आणि MI-17 हेलिकॉप्टरही शुक्रवारपासून या ऑपरेशनमध्ये सामील झाले. आतापर्यंत सुमारे 10 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.