Karnataka : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मूळ जिल्हा म्हैसूर येथे असलेल्या के. साळुंडी गावात दूषित पाणी प्यायल्याने एकाचा मृत्यू झाला असून ४८ हून अधिक लोक आजारी पडले आहेत. 24 वर्षीय कनकराजू असे मृताचे नाव आहे. सोमवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. आणखी 48 जण आजारी पडले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी जिल्हा आयुक्त आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतली. जलप्रदूषणाची कारणे शोधून योग्य उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
आजारी व्यक्तींवर योग्य उपचार करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जेडीएसचे आमदार जी.टी. देवेगौडा यांनी रुग्णालयाला भेट देऊन पीडितांना सरकारकडून नुकसान भरपाईची मागणी केली.