
Karnataka Honey Trap Case: कनार्टक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कर्नाटक राज्यातील कोडागू जिल्ह्यातील एका तलावातून निवृत्त सैनिकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हनी ट्रपच्या जाळ्यात अडकल्याचा दावा केल्यानंतर तो बेपत्ता झाला होता अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली. संदेश असं या मृताचे नाव होते. तो मडिकेरी शहराजवळील उक्कूडा येथील रहिवासी आहे. तपसाणीत सुसाईट नोट सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कोडागू जिल्ह्यातील तलावातून अधिकाऱ्यांनी निवृत्त सैनिकाचा मृतदेह बाहेर काढला. सापडलेल्या सुसाईट नोटमध्ये जीविता आणि सतीश नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने छळ केल्याचा आरोप केला होता. अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी मडिकेरी परिसराजवळ पॅम्पीनकेरे तलावातून मृतदेह बाहेर काढला. आरोपी महिलेने संदेश यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून त्याला जाळ्यात अडकवले होते.
नंतर आरोपी महिलेने मित्रांच्या मदतीने संदेशला धमकी दिली. संदेशकडून ५० लाख रुपयांची मागणी केली होती. हा त्रास सहन न झाल्याने आपल्या पत्नीला हा सर्व प्रकार सांगितला. यानंतर आरोपी महिला आणि तिच्या मित्राकडून होणाऱ्या छळाची माहिती एका चिठ्ठीत लिहली आणि त्याने स्वत:ला संपवण्यासाठी तलावात उडी मारली .मंगळवारी सुसाईड नोट सापडली असून बुधवारी तलावाजवळ त्याचे सामान सापडले.
मृतदेहाचा शोध घेण्यासाठी दक्षिण कन्नड येथून विशेष पथकाला पाचारण करण्यात आले. सैनिकाचा मृतदेह तलावाच्या तळाशी सापडला. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सुरू आहे.