कर्नाटक पोटनिवडणूक निकाल: भाजपला धक्का, काँग्रेस, जेडीएस बहुमताने विजयी; २०१९साठी कमळ धोक्यात, हात 'अच्छे दिन'च्या तयारीत
कर्नाटक लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप पराभूत (संग्रहित प्रतिमा)

कर्नाटकमध्ये पार पडलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा दणदणीत पराभव झाला आहे. कर्नाटकमधून बेल्लारी (आरक्षित), मांड्या, शिमोगा या लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या इतर जागांसाठी पोटनिवडणुका पार पडल्या. बल्लारी लोकसभा मतदारसंघ आणि जामखांडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवला आहे. मांडया लोकसभा आणि रामानागारा विधानसभा मतदारसंघातून जेडीएस उमेदवाराने विजय मिळवला आहे. कर्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कांग्रेसने भाजचा विजयी वारु रोखला होता. परंतु, तरीही गोव्याची पुनरावृत्ती कर्नाटकमध्येही करण्यासाठी आक्रमक राजकारण करण्याचा घाट भाजपने येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली घातला. पण, त्यालाही काँग्रेसने जोरदार झटका दिला. त्यामुळे या पराभवाचे उट्टे पोटनिवडणुकांच्या माध्यमातून काढण्यासाठी भाजपने कर्नाटकमध्ये तागद लावली होती. मात्र, कर्नाटकच्या जनतेने भाजपचे मनोरथ तडीस जाऊ दिले नाहीत.

कर्नाटकमध्ये लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन अशा एकूण पाच मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत झेलेल्या मतदानाची मोतमोजणी आज पार पडत आहे. या निवडणुकांसाठी मतदान शनिवारी पार पडले. एकूण मदानापैकी ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क वापरला. सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. तसेच, जनतेच्या मनातील सरकारप्रती असलेला विश्वास जाणून घेण्याचीही होती. या सर्वात विजयी कामगिरी करत काँग्रेस आणि जेडीएसने कर्नाटकात आपलाच आवाज असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. (हेही वाचा, राजकीय संघर्षातून टीआरएस नेता नारायण रेड्डी यांची दगडाने ठेचून हत्या)

दरम्यान, एचडी कुमारस्वामी यांची पत्नी उमेदवारी करत एसलेल्या रामनगरम विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीही पूर्ण झाली आहे. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृतपणे निकाल जाहीर केला नाही.