राजकीय संघर्षातून टीआरएस नेता नारायण रेड्डी यांची दगडाने ठेचून हत्या
नारायण रेड्डी यांची हत्या (Photo Credits: ANI)

तेलंगणामध्ये राजकीय संघर्षातून टीआरएस (TRS) नेता नारायण रेड्डी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना विकराबाद जिल्ह्यातील सुल्तानपुर गावात घडली आहे. आज सकाळी नारायण रेड्डी यांचा मृतदेह सापडला. संशयाचे बोट कॉंग्रेसकडे जात असल्याने, या घटनेनंतर टीआरएसचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले आणि त्यांनी रागाच्या भरात कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.

मिळालेल्या स्थानिक माहितीनुसार रविवारी नारायण ग्रुप आणि त्यांचे द्वंदी यांच्यात काही कारणास्तव वाद झाले होते, त्यानंतर राष्ट्रीय राजकीय पक्ष तेलंगाना राष्ट्र समितीच्या या नेत्याची हत्या करण्यात आली. याबाबतीत अजून पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल करून घेतला नाही. या हत्येनंतर गावातील भीतीचे वातावरण वाढले असून, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.