Photo Credit -X

J&K Forest Fire: उधमपूर (Udhampur) जिल्ह्यातील गंगेरा हिल येथील पिंगार वनक्षेत्र(Pingar Forest)मध्ये जंगलात भीषण आग (Forest Fire)लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जंगलाचा मोठा भाग जळून राख झाला आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील घोर्डी घाटातील दया धार जंगलात गेल्या तीन दिवसांपासून आगीच्या छोट्या-मोठ्या घटना घडत आहेत. त्यात वेगाने प्रगती होत आहे. सातत्याने प्रयत्न करूनही त्यावर नियंत्रण मिळवता येत नाही. जंगलात रोज नवीन भागात आगीची घटना घडत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या वनसंपत्तीचे नुकसान तर होत आहेच शिवाय वन्य प्राण्यांनाही याचा फटका बसत आहे. (हेही वाचा:J&K Bus Attack Update: जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; बस दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू )

काही भागात आग वस्तीपर्यंत पोहोचली आहे. राजोरीच्या डुंगू ब्लॉकमधील एका शाळेला याचा फटका बसला. रियासीच्या ध्यानगडमधील सलाल धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगलात आग लागली होती.

कठुआच्या रामकोट, बिलवार आणि बसोलीमध्ये जंगल अधूनमधून जळत आहे. उधमपूरच्या घोर्डी ब्लॉकमधील दया धार परिसरात तीन दिवसांपासून लागलेल्या आगीचा सामना करण्यासाठी हवाई दलाची हेलिकॉप्टर तैनात करण्याचे आवाहन प्रशासनाला करण्यात आले आहे. दरम्यान, रियासी येथे आग लावणाऱ्या दोघांची ओळख पटली आहे.