Panchayat elections in Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये पंचायत निवडणुका जाहीर; मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी केली घोषणा
Chief Election Officer Shailendra Kumar (PC - ANI)

Panchayat elections in Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीर प्रशासनाने पंचायत स्तरावरील रिक्त जागांसाठी निवडणूक (Panchayat Elections) घेण्याचे निश्चित केले आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) जम्मू-काश्मीरच्या पंचायत पोटनिवडणुकीची तारीखही जाहीर झाली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार (Chief Election Officer Shailendra Kumar) यांनी येत्या मार्चमध्ये रिक्त जागांवर पंचायत निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे. या पंचायत निवडणुका आठ टप्प्यात घेण्यात येणार आहेत.

येत्या 5 मार्चला निवडणुकीचा पहिला टप्पा तर 20 मार्चपर्यंत आठवा टप्पा पार पडणार आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने तेथील पंचायत स्तरावरील रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. मतपत्रिकांच्या साह्याने हे मतदान घेण्यात येणार आहे. आठ टप्प्यांत मतदान होणार असल्याची माहिती जम्मू-काश्मिरचे मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी दिली आहे. (हेही वाचा - Delhi Election Results 2020: 'भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण वक्तव्यांमुळेच पक्षाला पराभव प्राप्त झाला असावा'; दिल्ली विधानसभा निवडणुकानंतर अमित शाह यांची प्रतिक्रिया)

जम्मू-काश्मिरचे ऑगस्ट 2019 मध्ये विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधून लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला. त्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक पातळीवर निवडणुका होणार आहेत. 5 मार्चपासून सुरू होणाऱ्या पंचायतींच्या निवडणुकीसाठी मतपत्रिकांच्या साह्याने रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे.