Jagan Mohan Reddy (PC - Facebook)

Tirupati Laddu Row: वायएसआर काँग्रेस पत्राचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी तिरुपती मंदिराला भेट देण्याचा त्यांचा दौरा रद्द केला आहे. मंदिराच्या प्रसादाचे लाडू बनवताना त्यात प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याच्या आरोपावरून झालेल्या वादानंतर त्यांनी तिरुपती मंदिराला भेट(Tirupati Temple Visit)देण्याचा त्यांचा निर्णय रद्द केला आहे. (हेही वाचा: Tirupati Laddu Row: अयोध्या मंदिरात बाहेरील प्रसादावर बंदीची मागणी; मंदिरातील पुजाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रसाद तयार करण्याचे आवाहन)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

जगन मोहन रेड्डी यांच्या मागील सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीपासून तयार केलेले तूप वापरले गेल्याचा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या आठवड्यात केला. मात्र, नायडू यांनी राजकीय फायद्यासाठी बिनबुडाचे आरोप केल्याचा दावा वायएसआरसीपीने केला आहे. दाव्यांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.

गुजरातमधील एका खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालाचा दाखला देत नायडू यांनी हे आरोप केले. त्यात त्यांनी म्हटले की, प्रसाद बनवल्या जाणाऱ्या तुपात 'बीफ टॅलो', 'लोर्ड' (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि फिश ऑइलचा वापक केल्याचे त्यांनी म्हटले. तथापि, माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या दाव्यांचे खंडन केले आणि सांगितले की त्यांच्या कार्यकाळात अशी कोणतीही घटना घडली.

लाडू वादाच्या चौकशीसाठी एसआयटी समिती स्थापन

आंध्र प्रदेश सरकारने तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादात करण्यात आलेल्या भेसळीनंतर एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीचे नेतृत्व गुंटूर रेंजचे पोलीस महानिरीक्षक उत्तम त्रिपाठी करत आहेत. एसआयटी टीममध्ये विशाखापट्टणम रेंजचे उपमहानिरीक्षक IPS गोपीनाथ जट्टी, YSR कडप्पा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक IPS व्ही हर्षवर्धन राजू आणि तिरुपती जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक व्यंकट राव यांचा समावेश आहे.