Swati Maliwal Assault Case: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सहाय्यकाने हल्ला केलेल्या आप राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्या चेहऱ्यावर अंतर्गत जखमा झाल्याचे आढळले आहे. स्वाती मालीवाल यांची गुरुवारी वैद्यकीय चाचणी घेण्यात आली, ज्यात त्यांच्या चेहऱ्यावर अंतर्गत जखमा असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय चाचणी सुमारे 3 तास चालली. स्वाती मालीवाल यांचा एक्स-रे काढण्यासोबतच सिटी स्कॅनही करण्यात आला आहे. या चाचणीमध्ये मालीवाल यांच्या चेहऱ्यावर जखमा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार हे मुख्य आरोपी आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाच्या संदर्भात एफआयआर नोंदवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमारचा शोध तीव्र केला आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाने मालिवाल यांचा जबाब त्यांच्या निवासस्थानी नोंदवल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. स्वाती मालीवाल यांना विभव कुमार यांनी कानशीलात लगावली होती तसेच लाथाने मारहाण केली. याशिवाय, पोटात ठोसा मारला. (हेही वाचा -Swati Maliwal Assault Case: दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांचा खाजगी सचिव Bibhav Kumar विरूद्ध FIR दाखल)
स्वाती मालिवाल प्राणघातक हल्ला -
स्वाती मालीवाल यांची गुरुवारी रात्री सुमारे चार तास वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दिल्ली पोलिसांचे एक पथक रात्री 11 वाजता मालीवाल यांच्यासोबत एम्समध्ये पोहोचले. दिल्ली महिला आयोगाच्या सदस्या वंदना सिंग याही मालीवाल यांच्यासोबत होत्या. एक्स-रे आणि सीटी स्कॅन करण्यात आले. (हेही वाचा - MP Swati Maliwal accuses Arvind Kejriwal's PA: खासदार स्वाती मालीवाल यांचाकडून अरविंद केजरीवाल यांच्या PA वर मारहाणीचा आरोप, पोलिस यंत्रणा मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी)
स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की, तिच्यावर शारीरिक हल्ला केला. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे. पोलिसांचे पथक विभव कुमारच्या घरी पोहोचले. मात्र, तो सापडला नाही. सुमारे 10 पोलिस पथके या प्रकरणाच्या तपासात गुंतलेली आहेत, त्यापैकी चार पथके विभवचे लोकेशन ट्रेस करत आहेत. (हेही वाचा - Arvind Kejriwals PA Misbehaved with Swati Maliwal: स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनावर आपने तोडलं मौन, केजरीवालांच्या खासगी सचिवावर होणार कडक कारवाई)
दरम्यान, दिल्ली पोलीस या घटनेशी संबंधित मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील आठही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणार आहेत. केजरीवाल यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल यांची भेट घेतलेल्या सर्व लोकांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. स्वाती मालीवाल 13 मे रोजी टॅक्सीने केजरीवाल यांच्या घरी पोहोचल्या. पोलीस टॅक्सी चालकाचा जबाबही नोंदवणार आहेत. तथापी, दिल्ली भाजप महिला मोर्चाच्या सदस्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.