Ratan Khatri | X

मटका किंग (Matka King) नावाने लोकप्रिय असलेल्या रतन खत्री (Ratan Khatri) यांनी पुन्हा लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. नुकत्याच रीलीज झालेल्या कार्तिक आर्यन च्या 'चंदू चॅम्पियन' या सिनेमामध्येही हे नाव चर्चेत आलं आहे. भारतामध्ये सट्टेबाजी ची सुरूवात करून त्याला नव्या उंचीवर नेणार्‍यांपैकी एक मानले जाते. खत्री एका सिंधी परिवारातील होते. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर खत्री पाकिस्तान मधून भारतामध्ये आले होते. नंतर आयुष्यात त्यांची ओळख मटका किंग म्हणून झाली.

भारतामध्ये खत्री यांनी जुगाराच्या दुनियेत आपलं नाव कमावलं आहे. 1962 मध्ये मुंबईत सट्टेबाजीचा नवा प्रकार सुरू झाला आणि त्याला मटका म्हटलं गेलं. रतन खत्री यांनी याला एक मोठं रॅकेट बनवलं. खत्री ने देशात दशकांनुदशकं चालणारं गॅम्बलिंग नेटवर्क ची देखील स्थापना केली.

मटका ज्याला न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज मध्ये कापासाच्या सुरूवातीच्या आणि शेवटच्या दरांची बोली सट्टांच्या रूपात लावली जात होती. खत्रीच्या प्रभावाखाली ते एका मोठ्या, देशव्यापी जुगार नेटवर्कमध्ये विकसित झाले.

वरळी मटक्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मटका जुगाराच्या दुनियेतील आणखी एक महत्त्वाची व्यक्ती कल्याणजी भगत यांच्या हाताखाली खत्रीने सुरुवातीला काम केले. खत्री यांनी अखेर रतन मटका स्थापन करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्याच्या नेटवर्कमध्ये जगभरातील ख्यातनाम व्यक्ती आणि हाय-प्रोफाइल लोकांचा समावेश होता, ज्यामुळे रतन खत्री मटका किंग बनले.  What Is Satta Matka: सट्टा, मटका, कल्याण मटका म्हणजे काय; पैजेचा हा खेळ कसा असतो? 

आव्हानांना मात देऊन बनले किंग

खत्री यांचे जीवन आव्हानांनी भरलेले होते. भारतातील आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि 19 महिने तुरुंगात घालवले. या अडथळ्यांना न जुमानता, 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस निवृत्ती होईपर्यंत ते जुगार क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती राहिले. 2020 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांनी एक असा वारसा सोडला जो आजही लोकांना भुरळ घालत आहे.

मटका जुगाराच्या पद्धतीतही गेल्या काही वर्षांत लक्षणीय बदल झाले आहेत. सुरुवातीला, यामध्ये कापसाच्या किमतीवर सट्टेबाजीचा समावेश होता, परंतु 1960 च्या दशकात, मटका (मातीची भांडी) पासून स्लिप्स काढण्यासह रॅन्डम नंबर निवडण्याच्या विविध पद्धतींनी बदलले गेले. खत्री विशेषतः अंक काढण्यासाठी पत्ते खेळण्यासाठी प्रसिद्ध होते.