Equal Pay Act (फोटो सौजन्य - EDITED IMAGE, Wikipedia)

Equal Pay Act: दरवर्षी 8 मार्च रोजी महिला दिन (International Women's Day 2025) साजरा केला जातो. महिला दिनानिमित्त प्रत्येक महिलेने तिच्या हक्कांबद्दल माहिती मिळविण्यासाठी जागरूकता दाखवली पाहिजे. महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना वेगवेगळे अधिकार देण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला समान वेतनाच्या अधिकाराबद्दल (Equal Pay Act)  सांगणार आहोत.

समान वेतनासोबतच, महिलांनाही पुरुषांइतकेच बोनस किंवा भत्ता यासारख्या सुविधांचा अधिकार आहे. जर एखाद्या कंपनीने या कायद्याचे पालन केले नाही तर त्या कंपनीच्या मालकालाही शिक्षा होऊ शकते. (हेही वाचा - Happy Women's Day 2024 Messages in Marathi: जागतिक महिला दिनानिमित्त Images, WhatsApp Status, Wishes द्वारे खास मराठी शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस!)

समान वेतन कायदा काय आहे?

समान वेतन कायदा, 1976 नुसार, पगार किंवा वेतनासाठी लिंगाच्या आधारावर कोणालाही भेदभाव करता येत नाही. जर आपण हा कायदा सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा साधा अर्थ असा आहे की, महिलांना पुरुषांइतकेच वेतन मिळण्याचा अधिकार आहे. (हेही वाचा - जागतिक महिला दिनानिमित्त Wishes, Quotes, Images, Greetings शेअर करुन आपल्या आयुष्यातील खास महिलांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा!)

पूर्वी समाजात स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव होता. महिला केवळ चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादीत होत्या. परंतु, आता महिलाही पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून चालत आहेत. पुरुष आणि स्त्री दोघेही एकत्र घर सांभाळत आहेत आणि एकत्र पैसेही कमवत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणात समान वेतनाच्या अधिकाराने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे.