राहुल गांधी यांनी फोटोग्राफरचा पकडला हात; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Rahul Gandhi checks on a photographer who tripped and fell at Bhubaneswar Airport | (Photo courtesy: ANI)

काँग्रेस अध्यक्ष (Congress President ) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रसंगावधानाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या संदर्भातला एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ भुवनेश्वर विमानतळाबाहेरचा (Bhubaneswar Airport) आहे. राहुल गांधी सध्या ओडिसा (Odisha) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी ते भुवनेश्वर विमानतळावर उतरले. विमानतवरुन बाहेर येताना त्यांची छबी टीपण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांची एकच झुंबड उडाली. दरम्यान, छायात्रकार (Photographer) छायाचित्रं टीपत असताना तिथे असलेल्या पायऱ्यांवरुन एका छायाचित्रकाराचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्याला पाहताच क्षणाचाही विलंब न लावता राहुल गांधी पुढे धावले आणि त्यांनी त्याला हात दिला. ज्यामुळे छायाचित्रकाराला (Photographer) सावरता आले. उपस्थिती प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी हा प्रसंग लागलीच चित्रित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच चर्चेत आहे.

दरम्यान, या प्रसंगानंतर राहुल गांधी यांनी भुवनेश्वरमध्ये सभा घेतली या सभेला संबोधित करताना त्यांनी मोदी सरकार आणि आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. भाजप सरकारने आपल्या सत्ताकाळात देशातील संस्ता मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. या संस्था आरएसएस आणि भाजपच्या इशाऱ्यावरुनच मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी या वेळी केला. गेल्या साडेचार वर्षाच्या काळात सरकारने सर्वसामान्य जनता आणि मध्यमवर्गासाठी काहीही केले नाही, असा आरोप गांधी यांनी केला. (हेही वाचा, बहीण प्रियंका गांधी यांना बंधू राहुल गांधी देणार गिफ्ट; लोकसभा निवडणुकीत घडणार चमत्कार?)

दरम्यान, सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि संघाने आजवर मला जितकी शिवीगाळ केली आहे त्याचा मला फायदाच झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी कधीही तिरस्कार करत नाही. त्यांची आणि आमची विचारधारा वेगळी आहे. त्यांच्या विचारधारेविरोधात मी सदैवर लढत राहिन. त्यानी माझा कितीही तिरस्कार केला तरीही मी त्यांच्याशी प्रेमानेच वागेन, प्रेमानेच संवाद साधेन असेही राहुल गांधी या वेळी म्हणाले.