SBI Recruitment 2019: स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये 477 Specialist Cadre Officers पदांसाठी नोकर भरती जाहीर; sbi.co.in वर करा 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज
SBI (Photo Credits-Twitter)

स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून नुकतीच 35 विविध पदांसाठी सुमारे 477 जागांसाठी उमेदवारभरती जाहीर करण्यात आली आहे. याद्वारा Specialist Cadre Officers यांची नियुक्ती केली जाणार असल्याचं एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलं आहे. यासाठीचे नोटीफिकेशन 6 सप्टेंबर 2019 दिवशी जाहीर करण्यात आलं आहे. येत्या 25 सप्टेंबरपर्यंत बॅकेमध्ये नोकरी करू इच्छिणार्‍यांना अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा, मुलाखतीद्वारा योग्य उमेद्वारांची निवड केली जाणार आहे.

IT Security Expert,IT Risk Manager, IT Security Expert, (Cyber Security - Threat Hunting)अशा विविध 35 पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. मात्र याकरिता एकावेळेस एका उमेदवाराला केवळ एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे एसबीआयच्या या नोकरभरतीमध्ये अर्ज करण्यापूर्वी कोणत्या पदांसाठी ही नोकरभरती सुरू करण्यात आली आहे त्याची यादी बॅंकेच्या अधिकृत संकेत स्थळावर एकदा नक्की तपासून पहा.

एसबीआय मध्ये Specialist Cadre Officers पदांसाठी कसा कराल अर्ज?

  • https://sbi.co.in/ किंवा https://ibpsonline.ibps.in/sbiscosaug19/ यावर क्लिक करा.
  • यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करा.
  • अर्ज भरल्यानंतर अवश्यक डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करावी लागणार आहेत.
  • त्यानंतर ऑनलाईन फी / पेमेंट करा.
  • यानंतर तुम्हांला अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल.

कशी होणार निवड प्रक्रिया?

दोन महत्त्वाच्या निकषांवर Specialist Cadre Officers ची निवड होणार आहे. यामध्ये कॅटेगरी, लेखी परीक्षा आणि मुलाखत यावरून निवड केली जाणार आहे. अंदाजे 10 ऑक्टोबरपर्यंत परीक्षेसाठी कॉल लेटर वेबसाईटवर अपलोड केलं जाईल. Maharashtra Police Bharti 2019: महाराष्ट्र राज्यभर पोलिस शिपाई भरती 2019 ला आजपासून सुरूवात; mahapariksha.gov.in वर करा अर्ज

एबीआयमधील या नोकरभरतीमध्ये वय, अनुभव हे निकषदेखील मह्त्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ती पडताळून पहा त्यानंतर अर्ज दाखल करा. आवश्यक कागदपत्रांची देखील यादी एकदा नक्की तपासा.