Rupee vs Dollar: डॉलरपुढे घसरला रुपाया; नागरिकांच्या जीवनावर काय होतो परिणाम? घ्या जाणून
Rupee vs Dollar | (Photo Credit: Archived, edited, representative images)

अमेरिकी चलन डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन असलेला रुपया प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. आज (मंगळवार, 19 जुलै) बाजार सुरु झाला तेव्हापासूनच रुपयाची घसरण सुरु झाली. आज दिवसभरात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 80.05 रुपये प्रति डॉलर (Dollar) इतका झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर अधिक सक्षम राहिल्याने आणि कच्चा तेलाच्या किमती वाढल्याने बाजार सुरु होताच रुपया डॉलरच्या (Rupee vs Dollar) तुलनेत घसरला. 2022 वर्षाच्या सुरुवातीपासूनच रुपयात काहीशी घसरण होताना पाहायला मिळाली. वर्षाच्या सुरुवातीपासूनच रुपया प्रती डॉलर 74 रुपयांच्या आसपास राहिला आहे. मात्र, पाठिमागच्या सात महिन्यांमध्ये मात्र रुपया मोठ्या प्रमाणावर घसरताना दिसतो आहे. जाणून घ्या डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर त्याचा भारतीय नागरिकावर काय परिणाम होतो.

विदेशी वस्तुंची आयात महागते

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर देशात आयात केलेल्या मालावर अधिक पैसा खर्च होतो. विदेशातील वस्तुंची आयात महाग होते. आगोदरच्या तुलनेत अधिक पैसे द्यावे लागतात. सहाजिकच महागायी वाढते. जसे की विदेशातून आयात केलेल्या वस्तूची किंमत जर एक डॉलर असेल तर त्यासाठी जानेवारी महिन्यात 74 रुपये मोजावे लागत. तिच वस्तू आज मागवली तर त्यासाठी 80 रुपये मोजावे लागतील. म्हणजेच ती वस्तू 6 रुपयांनी महागम मिळेल.

इंधन दरात वाढ

भारत आपल्या एकूण क्षमतेपैकी 80% इंधन हे आयात करतो. जर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तर भारताला विदेशातून आयात केलेले इंधन अधिक महाग खरेदी करावे लागेल. सहाजिकच देशांतर्गत विक्री, घरगुती बाजारपेठांवर त्याचा परिणाम होऊन महागाई वाढणार. सध्यास्थितीत पेट्रोल, डिझेल दर वाढण्याचे प्रमुख कारण हेच आहे.

विदेश यात्रेवर परिणाम

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याचा परिणाम विदेश यात्रेवर मोठ्या प्रमाणावर होतो. उदाहरणच द्यायचे तर जर आफण जानेवारी महिन्यात विदेशातील एखाद्या देशात फिरायला किंवा काही कामानिमित्त गेलात. त्यासाठी त्या वेळी 1000 डॉलर म्हणजेच 74,000 रुपये खर्च आला असेल तर त्याच यात्रेसाठी आज तुम्हाला 80,000 रुपये द्यावे लागू शकतात.

दरम्यान, असेही सांगितले जाते की, रुपया कमजोर झाल्यास भारतीय मालाला जगभरातून मागणी वाढेल. सहाजिकच निर्यात वाढेल. परंतू, ती खरोखरच वाढलेल का याबाबत मात्र निश्चित सांगता येत नसल्याचे अभ्यासक सांगतात.