आज मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून आरबीआय ग्राहकांना आर्थिक व्यवहारासाठी RTGS ही सुविधा 24 तास खुली केली जाणार आहे. वर्षभरापूर्वी NEFT ची सेवा 24X7 सुरू झाल्यानंतर आता Real-Time Gross Settlement देखील 24 तास खुले होणार असल्याने अनेकांसाठी डिजिटल आर्थिक व्यवहार करणं सुकर होणार आहे. ऑक्टोबर 2020 मध्येच आरबीआयचे पतधोरण जाहीर करताना याची घोषणा करण्यात आली होती. आज आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पुन्हा त्याची माहिती दिली आहे. पण तुम्हांला RTGS सेवा म्हणजे काय? त्याच्या मार्फत कोणते आर्थिक व्यवहार होऊ शकतात? किती रक्कम ट्रांसफर होऊ शकते? असे प्रश्न पडले असतील तर खालील माहिती वाचा आणि तुमच्या मनातील या सार्या प्रश्नांची उत्तरं मिळवा. RTGS च्या सुविधेचा नागरिकांना आता 24 तास लाभ घेता येणार, पैसे ट्रान्सफर करण्यासंबंधित जाणून घ्या अधिक.
RTGS (Real-Time Gross Settlement) facility becomes operational 24X7 from 12:30 am tonight: RBI Governor Shaktikanta Das
(file pic) pic.twitter.com/pJaxgmh978
— ANI (@ANI) December 13, 2020
RTGS म्हणजे काय?
मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी RTGS द्वारा पैसे रिअल टाईममध्ये म्हणजे अवघ्या काही मिनिटांत ट्रान्सफर केले जाऊ शकतात. याकरिता किमान 2 लाख आणि जास्तीत जास्त कितीही अशी मर्यादा आहे.
RTGS चे चार्जेस किती असतात?
देशामध्ये डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी याकरिता आरबीआयने जुलै 2019 पासून RTGS, NEFT वरील सेवाशुल्क काढून टाकले आहे. हा व्यवहार निशुल्क केला जाऊ शकतो.
RTGS साठी कमाल मर्यादा किती?
RTGS करण्यासाठी व्यवहार किमान 2 लाख रूपयांचा असणं गरजेचे आहे. पण कमाल मर्यादा नाही. त्यामुळे जास्तीत जास्त कितीही रूपये ट्रांसफर केले जाऊ शकतात.
RTGS आणि NEFT मध्ये फरक काय?
NEFT आणि RTGS व्यवहार हे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी असले तरीही पूर्वी त्यामध्ये वेळेस, बॅंकेच्या व्यवहारांच्या वेळेचे, सुट्टीचं बंधन होतं. मात्र आता या दोन्ही सेवा 24 तास खुल्या केल्या आहेत. NEFT मध्ये किमान, कमाल मर्यादा नाही. तर RTGS हे मोठ्या व्यवहारांसाठी आहे. ज्यात किमान 2लाखापासूनची रक्कम ट्रांसफर करण्यासाठी वापरली जाते. पण या व्यवहारातही कमाल मर्यादा नाही.
पूर्वी आरटीजीएसने व्यवहार करायचा असल्यास तो कामाच्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्येच केला जात असे. दरम्यान बॅंकेच्यावेळेनुसार त्याच्या सेटलमेंटच्या वेळा आणि व्यवहारांच्या वेळा बदलत होत्या.