आरटीजीएसची (RTGS) सुविधा आता फक्त एका क्लिकवर आठवडाभर 24 तास सुरु राहणार आहे. लवकरच ऑनलाईन बँकिंग फंड ट्रान्सफरची RTGS सर्विसचा फायदा ग्राहकांना आता कधी ही आणि कोणत्याही वेळी घेता येणार आहे. RBI ऑनलाईन मनी ट्रान्सफर-रियल टाइम ग्रॉस सेटमेंट सुविधेमध्ये आता काही नवे ऑप्शन ही दिले जाणार आहेत. ही सुविधा नागरिकांसाठी येत्या 14 डिसेंबर पासून सर्वांसाठी सुरु होणार आहे. (7th Pay Commission: नव्या वर्षात 'या' सरकारी कर्मचा-यांना पगार आणि डीए मध्ये मिळणार घसघशीत वाढ)
आरबीआयच्या मते 14 डिसेंबर पासून मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून आरटीजीएसची सुविधा नागरिकांसाठी 24 तास सुरु राहणार आहे. भारतातील सर्वच ठिकाणी या सुविधेचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. 16 मार्च 2004 मध्ये फक्त 3 बँकांसोबत आरटीजीएसची सुविधा सुरु केली होती. मात्र ही आता ही सर्विस 237 बँकांसोबत जोडली गेली आहे. आरटीजीएसच्या माध्यमातून प्रत्येक दिवसाला 4 कोटी रुपयांचे 6 लाखांहून अधिक ट्रांजॅक्शन केले जात होते.
आरबीआयने ऑक्टोंबरमध्ये क्रेटिड पॉलिसी मध्ये आरटीजीएस 24 तास सुरु करण्याचे जाहीर केले होते. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी काही ऑप्शन ही आता दिले गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक पॉप्युलर RTGS, NEFT आणि IMPS चा समावेश आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात NEFT ही 24 तासांसाठी सुरु केली होती. (ITR Filing For 2019-20 यंदा 31 डिसेंबर 2020 पूर्वी भरताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी)
RTGS म्हणजे रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट. आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याची ही सर्वाधिक फास्ट सुविधा आहे. तर NEFT च्या माध्यमातून पैसे पाठवल्यानंतर ते क्रेडिट होण्यास काही वेळ लागतो. मात्र आरटीजीएसच्या माध्यमातून ते अवघ्या काही वेळात पोहचले जातात. याचा वापर 2 लाखांहून अधिक रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. बँक हॉलिडे आणि पब्लिक हॉलिडेच्या दिवश कोणतेच सेटलमेंट केले जात नाही.
दरम्यान, आतापर्यंत आरटीजीएस करण्यासाठी बँकेच्या वर्किंग दिवसातच सुविधा उपलब्ध करुन दिली जात होती. त्यासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंतची वेळ ठरवण्यात आली होती. पण बँक हॉलिडे आणि पब्लिक हॉलिडेच्या दिवशी कोणतीही सेटलमेंट केली जात नव्हती. आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी काही शुल्क ही आकारले जात होते.