Nagaland State Dear Lottery साठी Paresh Rawal ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर; 6 रूपयांत करोडपती बनवू शकणार्‍या या लॉटरीचा इथे पहा निकाल!
Lottery

परेश रावल या बॉलिवूड अभिनेत्याने हिंदी सिनेमा, गुजराती रंगभूमी वरून प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. पण त्यासोबतच त्यांच्या सामाजिक प्रश्न आणि राजकीय मंचावरील भूमिका देखील प्रभावी आहे. आता त्यांचा चेहरा Nagaland State Dear Lottery साठी Ambassador म्हणून निवडला गेला आहे. Nagaland State Dear Lottery चं तिकीट अवघ्या 6 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या त्यांची यासाठीची जाहिरात “Good Life Ticket, just for Rs 6” देखील आली आहे.

Nagaland State Dear Lottery मध्ये विजेता अवघ्या 6 रूपयांच्या तिकीटामध्ये करोडपती होऊ शकतो. भारतामध्ये 13 राज्यांत लॉटरी वैध आहे. त्यामध्ये नागालँड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, पंजाब, मिझोराम, केरळ, महाराष्ट्र, गोवा, मणिपूर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे.

लॉटरीचे निकाल कधी, कुठे असतात?

नागालँड राज्याचा "डियर इंडस मॉर्निंग" दुपारी 1 वाजताचा निकाल असतो तर नागालँड "डियर हिल इव्हनिंग" लॉटरी निकाल संध्याकाळी 6 वाजता जाहीर केला जातो तर नागालँड "डियर पेलिकन नाईट" लॉटरी निकाल रात्री 8 वाजता जाहीर केला जातो. नागालॅंड लॉटरीचा निकाल अधिकृत वेबसाईट nagalandlotterysambad.com आणि ww.nagalandlotteries.com,www.lotterysambad.com वर नियमित पाहता येतो.अधिकृत वेबसाईट वर तुमच्या तिकीटावर नाव असलेल्या लॉटरीची रिझल्ट लिंक पहा.

DEAR LOTTERY या युट्युब चॅनेल वर देखील तुम्ही दिवसातून तीन वेळा जाहीर होणारे हे निकाल लाईव्ह देखील पाहू शकता.

Nagaland Lottery मध्ये पहिल्या विजेत्याला 1 कोटी, दुसर्‍या विजेत्याला 9 हजार, तिसर्‍याला 450, चौथ्या विजेत्याला 250 आणि पाचव्या विजेत्याला 120 रूपये मिळणार आहेत. तर उत्तेजनार्थ रविजेत्यांची रक्कम 1000 रूपये असते.

सध्या नागालॅंड लॉटरीसाठी परेश रावल सोबतच प्रथमेश परब देखील जाहिरातीमध्ये झळकत आहे.