PAN Card-Aadhar Card Link (File Photo)

Aadhaar PAN Link: स्थायी खाते क्रमांक (पॅन) आधारशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च रोजी संपणार आहे. जर तुमचा पॅन नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तर पुढच्या महिन्यापासून तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय होईल. इतकेचं नाही तर तुम्हाला दंड म्हणून एक हजार रुपये द्यावे लागतील. गेल्या आठवड्यात सरकारने लोकसभेत वित्त विधेयक 2020 मंजूर केले. यात नवीन कलम 234H समाविष्ट करण्यात आले. ज्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला आपले पॅन कार्ड आधारशी जोडण्यात उशीर झाल्यास त्या व्यक्तीला एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.

दरम्यान, अनेक आर्थिक कार्यांसाठी पॅन कार्ड अत्यंत महत्वाचे असते. पॅनकार्ड बँक खाते उघडण्यासाठी आणि म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी आवश्यक आहे. याशिवाय 50,000 रुपयांच्या वरच्या व्यवहारांसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. (वाचा - Income Tax विभागाला आधार कार्डचा क्रमांक न दिल्यास भरावा लागेल 'इतका' दंड, जाणून घ्या सविस्तर)

पॅन कार्ड ला आधार कार्डाशी कसे जोडावे -

  • पॅनला आधारशी जोडण्यासाठी आयकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलला भेट द्या.
  • आता डाव्या बाजूला Link Aadhaar विभागात क्लिक करा.
  • येथे आपण पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करा.
  • आता कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  • आता तुम्ही 'Link Aadhaar' पर्यायावर क्लिक करा.
  • आता प्राप्तिकर विभाग आपले नाव, जन्मतारीख इ. सत्यापित करेल आणि त्यानंतर जोडण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी सरकारने अनेक वेळा मुदतवाढ दिली आहे. ही अंतिम मुदत 30 जून 2020 पर्यंत 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती. पॅन नंबर निष्क्रिय झाल्यानंतर आपण अनेक आर्थिक व्यवहार करण्यास सक्षम असणार नाहीत.