JioMart Express: देशात काही मिनिटांत किराणा सामान पोहोचवण्याची (Instant Grocery Delivery) स्पर्धा वाढत आहे. आता रिलायन्स इंडस्ट्रीजही (Reliance Industries) JioMart प्लॅटफॉर्मद्वारे या शर्यतीत सामील होणार आहे. कंपनीने या सेवेला 'JioMart Express' असे नाव दिले आहे. या सेवेअंतर्गत कंपनी काही तासांत किराणा सामान वितरित करेल.
कंपनी येत्या 2 ते 4 दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करेल. या सेवेची सुरुवात नवी मुंबईपासून होणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. वृत्तानुसार, JioMart ने पुढील तिमाहीच्या अखेरीस 200 शहरांमध्ये ही सेवा विस्तारित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनी सध्या देशातील सुमारे 200 शहरांमध्ये किराणा मालाची डिलिव्हरी करते. यासह, कंपनीने पुढील काही महिन्यांत आपली पोहोच दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. (हेही वाचा - SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट! पैशासाठी QR कोड स्कॅन करू नका, अन्यथा होईल मोठ नुकसान)
कंपनीने B2B प्रोग्राम अंतर्गत लाखो किराणा स्टोअर्सना JioMart Partner बनवले आहे. JioMart एक्सप्रेस सेवेचा विस्तार या किराणा दुकानांद्वारे केला जाईल. यासोबतच कंपनी आपले डिलिव्हरी नेटवर्क आणि Dunzo देखील वापरणार आहे. डंझोची महानगरांमध्ये जोरदार उपस्थिती आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने या वर्षाच्या सुरुवातीला बेंगळुरूस्थित क्विक कॉमर्स स्टार्टअप डन्झोमध्ये 26 टक्के हिस्सा विकत घेतला होता.
दरम्यान, JioMart पूर्वी अनेक कंपन्यांनी किराणा मालाची झटपट डिलिव्हरी सुरू केली आहे. यामध्ये ब्लिंकिट (पूर्वीचे ग्रोफर्स), झेप्टो इ. अलीकडे Zomato ने 10 मिनिटांत अन्न वितरण सुरू केले आहे. वृत्तानुसार, नवी मुंबईतील पायलट ऑपरेशन दरम्यान 1-3 तासात माल वितरित केला जाईल. यानंतर, कंपनीची डिलिव्हरी वेळ 45 मिनिटांवरून एक तास कमी करण्याची योजना आहे. यानंतर कंपनी आपली रेंजही वाढवणार आहे.