भारतीय जीवन बीमा निगम म्हणजे एलआयसी (LIC Policy) पॉलिसी असणार्यांसाठी एक महत्त्वाची आहे. जर तुमच्याकडे LIC पॉलिसी असेल आणि जर ती मॅच्युअर होणार असेल तर तुम्हांला एका महत्त्वाच्या गोष्टीची खबरदारी घेणं आवश्यक आहे. तुम्हांला बॅंक अकाऊंट (Bank Account) पॉलिसीसोबत लिंक करणं आवश्यक आहे. 1 मार्चपूर्वी तुम्ही पॉलिसी खात्यासोबत लिंक केली नाही तर तुमचे पैसे अडकण्याची शक्यता आहे.
बॅंक अकाऊंट सोबत लिंक करणं आवश्यक
LIC ने काही दिवसांपूर्वी त्यांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नव्या नियमांनुसार, पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हांला पैसे थेट खात्यामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे LIC सोबत अकाऊंट लिंक करणं आवश्यक आहे. ज्यांचं अकाऊंट लिंक नाही त्यांचे पैसे रोखण्यात आले आहेत.
LIC कडून मेसेज अलर्ट
LIC आपल्या ग्राहकांना अलर्ट करण्यासाठी एसएमएस पाठवण्यात आले आहेत. यामध्ये पॉलिसी बॅंक खात्यासोबत लिंक करण्याची सूचना आहे. सोबतच एलआयसी त्यांच्या सार्या सोयी डिजिटल करणार आहेत. 1 मार्च 2019 पासून प्रत्येक ग्राहक ऑटोमेटेड एसएमएसद्वारा पॉलिसी प्रिमियम, पॉलिसी मॅच्युरिटी, पॉलिसी होल्ड या बाबत माहिती देणार आहे. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबरदेखील एलआयसी सोबत रजिस्टर करायला हवा. नसल्यास तुम्हांला लवकरात लवकर तो रजिस्टर देखील करावा लागेल.
बॅंक अकाऊंट लिंक कसं कराल?
तुम्ही एक कॅन्सल चेक किंवा पासबुकाच्या फ्रंट पेजची झेराॅक्स घेऊन तुम्ही LIC बँचमध्ये जा. तिथे NEFT मँडेट फॉर्म भरावा लागेल. त्याला तुम्ही कॅन्सल चेक किंवा पासबुकच्या फ्रंट पेजची फोटोकॉपी जोडा. आठवड्याभरात खात्याचा नंबर LICला जोडला जाईल आणि पैसे थेट खात्यात जमा होतील.