जम्मू-काश्मिर : सहा दशहवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश
फोटो सौजन्य- ANI

जम्मू-काश्मिर(Jammu-Kashmir) मध्ये अनंतनाग जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांना सहा दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. तर आणखी दहशतवादी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

श्रीनगर सीमारेषेवर पाकिस्तान दिवसेंदिवस कुरघोडी करत आहेत. तर जम्मू-काश्मिर मध्ये अनंतनाग येथे दहशतवादी हल्ला चालू आहे. मात्र भारतीय लष्कराच्या जवानांनी सहा दशहतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर परिसरात आणखी लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणी अनंतनाग जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यापूर्वी शोपियन जिल्ह्यात चकमकी दरम्यान चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते.