Isha Ambani (Photo Credits: Instagram)

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी हिचा शाही विवाहसोहळा गेल्यावर्षी 12 डिसेंबर रोजी पार पडला. पिरामल इंटरप्रायजेसचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याशी इशाने लग्न झाले. यशाचा विवाह सोहळा भव्यदिव्यतेमुळे एक चर्चेचा विषय ठरला होता.

इशाचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. पण तिचं एकही वेरिफाइड अकाउंट सोशल मीडियावर नसल्याने तिच्या नावाचे अनेक फेक युझर्स आपल्याला पाहायला मिळतात.

पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की इशा सोशल मीडियाचा वापर करत असली तरी तिने तिचे अकाउंट मात्र सिक्रेट ठेवले आहे. आणि काही ठराविक लोकांनाच तिने आपले फोटो बघायची परवानगी दिली आहे.

इतकंच नव्हे तर ईशाने तिचे खरे इंस्टाग्राम अकाउंट वेरीफाय देखील केलेले नाही. '_iiishmagish' हे तिच्या खऱ्या इंस्टाग्राम अकाउंटचं युझरनेम आहे. विशेष म्हणजे प्रियंका चोपड़ा, आलिया भट्ट, कियारा आडवाणी, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर ची पत्नी मीरा राजपूत-कपूर यांसारखे मोठमोठे सेलिब्रिटी व बॉलीवूडमधील दिग्गज मंडळी तिला फॉलो करतात.

प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण नंतर आता आलिया भट सुद्धा हॉलीवूड वारीच्या तयारीत? वाचा सविस्तर

ईशा देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची मुलगी असल्याने तिचे नाव फोर्ब्सच्या यादीत बिलेनिअर उत्तराधिकारी म्हणून सामील करण्यात आले आहे.