Coronavirus: आयकर परतावा, आधार-पॅन लिंक करण्यास केंद्राकडून 30 जून पर्यंत मुदतवाढ, अडचणीत सापडलेल्या उद्योगासाठी पॅकेज जाहीर करणार: निर्मला सीतारमण
Nirmala Sitharaman | (Photo Credits: ANI)

आयकर परतावा भरणे (Income Tax Return) आणि आधार-पॅन लिंक (Aadhaar-PAN Link) करणे या दोन्हीसाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. या दोन्ही गोष्टी करण्यासाठी आता 30 जून पर्यंत मुदत असणार आहे. तसेच, अडचणीत सापडलेल्या उद्योगांना बाहेर काढण्यासाठी लवकरच एक आर्थिक पॅकेजही जाहीर केले जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आजक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी बोलताना अर्थमंत्री (Nirmala Sitharaman) म्हणाल्या आर्थिक पॅकेज तयार करण्याबाबत अर्थमंत्रालय सध्या काम करत आहे. लवकरच त्याची घोषणा केली जाईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, टीडीएस भरण्यासाठी उशीरा पेमेंट केल्यास आकारण्यात येणारे व्यास 12% वरुन 9% करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी इनकम टॅक्स फाईल करण्याची शेवटची तारीख 30 जून ठेवण्यात आली आहे. तसेच, विवाद से विश्वास योजना कालावधीही 30 जून पर्यंत वाढवण्यात आला आहे. (हेही वाचा, निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या Petrol Diesel वरील Excise Duty 8 रुपयाने वाढवण्याच्या दुरुस्ती विधेयकाला संसदेत मंजुरी)

कोरोना व्हायरस भारतासह जगभरात फैलावला आहे. त्याचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेत मंदी सदृश्य स्थिती आहे. त्यामुळे येत्या काळात भारताला मोठ्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल असे चित्र आहे. त्यात कोरोना व्हायसमुळे अनेक ठिकाणी जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, देशातील अनेक शहरं लॉकडाऊन करण्यात आलेली आहेत. त्यामुलेही अर्थव्यवस्थेला ब्रेक लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे.