Aadhaar-PAN Card Link: पॅन-आधार लिंक करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मूदतवाढ; 'असं' करा आधार-पॅन लिंक
PAN-Aadhaar (Photo Credits: PTI)

Aadhaar-PAN Card Link: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने (Income Tax Department) पॅन-आधार लिंक (Aadhaar-PAN Card Link) करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2020 देण्यात आली होती.

पॅन-आधार लिंक केले नाही तर इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा थांबवायचा असेल, तर आधार-पॅन लिंक करणं आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाकडून नागरिकांना इशारा देण्यात आला होता की, पॅन-आधार लिंक न केल्यास पॅनकार्ड रद् करण्यात येईल. परंतु, आता ही तारीख वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा - New ATM Cash Withdrawal Rules: डेबिट कार्डधारकांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून बदलणार बँक एटीएममधून पैसे काढण्याचे नियम, वाचा सविस्तर)

असं करा पॅन-आधार लिंक -

आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा.

तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या.

येथे तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. परंतु, तुमचं आधार कार्ड लिंक झालेलं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव टाकून तुम्ही 'लिंक आधार' पर्यायावर क्लिक करून पॅन-आधार जोडणी करू शकता.

जोडणी झाली की नाही हे पाहण्यासाठी View Link Aadhaar Status' वर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल.

यासंदर्भात तुम्ही 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनदेखील माहिती मिळवू शकता.

यासाठी तुम्हाला UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही याबद्दल माहिती मिळू शकेल. वर दिलेल्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या पॅन-आधार लिंक करू शकता.