नववर्ष 2021 साठी आयकर विभागाने (Income Tax Department) 'HONORING THE HONEST' या नावे कलेंडर जारी केले आहे. नवीन युगात आपले स्वागत आहे. हे युग जिथे टॅक्स सिस्टम शेमलेस (Shameless), फेसलेस (Faceless) आणि पेपरलेस (Paperless) बनत आहे, असे या कलेंडरमध्ये म्हटले आहे. तसंच याद्वारे त्यांनी करदात्यांचे कौतुक केले आहे. यासाठी आयकर विभागाने म्हटले की, "करदात्यांचा प्रामाणिकपणा आणि कष्ट देशाच्या प्रगतीला मोठी ताकद देतो आणि त्यांचे कौतुक करणे आमचे कर्तव्य आहे." या विचारामुळे पारदर्शक कर आकारणी या प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली.
यापूर्वी, 30 डिसेंबर रोजी सरकारने आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत 10 दिवसांनी वाढवून 10 जानेवारी 2021 केली होती. तर व्यवसायांकडूनही आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.
या कलेंडरमध्ये करदात्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व तारखा देण्यात आल्या आहेत. 2021 चे कलेंडर PDF स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
आयटीआर फायलिंगची डेटलाईन तिसऱ्यांना वाढवण्यात आली आहे. प्रथम 31 जुलै असलेली मुदत 30 नोव्हेंबर 2020 करण्यात आली आणि त्यानंतर हा कालावधी 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आला. पुन्हा ही मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय आर्थिक वर्ष 2019-20 चा जीएसटी वार्षिक परतावा भरण्याची तारीख 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. (ITR भरल्यानंतर 7 दिवसानंतर Refund मिळाला नाही? जाणून घ्या कोणत्या चूका असण्याची शक्यता)
आर्थिक वर्ष 2019-20 च्या इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग राहिलेल्या व्यक्तींसाठी 10 जानेवारी ही अंतिम तारीख आहे. आयटीआर 1 आणि आयटीआर 4 अंतर्गत फायलिंग करणाऱ्या आणि अकाऊंट्चे ऑटीट करण्याची गरज नसणाऱ्या व्यक्तींसाठी ही मूदतवाढ केली आहे.
एखाद्या फर्मचे पार्टनर्स आणि अकाऊंट्चे ऑडिट करण्याची गरज असणाऱ्या व्यक्तींसाठी फायलिंग करण्याची मुदतवाढ 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत करण्यात आली आहे. या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय व्यवहारासंदर्भात एक रिपोर्ट सब्मिट करणे देखील गरजेचे आहे.