Representational Image (Photo Credits: PTI)

मोदी सरकार आल्या नंतर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला देशभरात नवनवीन बदल होतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मग हा बदल आर्थिक क्षेत्रात असो किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात. त्याच पार्श्वभूमीवर येत्या 1 नोव्हेंबरपासून देशभरात नवीन नियम लागू होणार आहेत. या बदलांमुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल, तर 1 नोव्हेंबरपासून डिपॉझिटवरचे व्याजदर बदलणार आहेत.

एसबीआय ने या आधी 9 ऑक्टोबरला घोषणा केली होती, की 1 लाख रुपयांपासून डिपॉझिटवर व्याजदर 0.25 टक्के घटवून 3.25 टक्के करण्यात आलं आहे. तसेच 1 लाखांहून जास्त डिपॉझिट केलेली रकमेवरच्या व्याजाला रेपो रेटशी जोडण्यात आलं आहे.

हेदेखील वाचा- SBI खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! ATM चा वापर, पैसे काढण्याची मर्यादा ते कर्ज दर यांच्यामध्ये 1 ऑक्टोबर पासून झालेत महत्त्वाचे बदल

या नव्या नियमानुसार, 50 कोटींहून अधिक रकमेची उलाढाल असलेल्या व्यावसायिकांसाठी हा नवा नियम लागू होणार आहे. त्यासाठी व्यावसायिकांना त्याची सर्व महत्त्वाची माहिती ईमेलद्वारे dirtp14@nic.in यावर पाठवावी लागणार आहे.

यासोबतच सार्वजनिक बँकांच्या वेळापत्रकातही बदल होणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार, निवासी क्षेत्रातील सर्व बँका सकाळी 9 वाजता उघडतील आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कामकाज सुरु राहील. तर व्यापारी क्षेत्रातील वर्गासाठी बँकांची कामकाजाची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर उर्वरित सर्व बँका सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील.

1 ऑक्टोबरपासून एसबीआय बँकेच्या नियमात काही बदल करण्यात आले होते. एसबीआय यांच्या नियमांनुसार, आता ग्राहकांना 25,000 रूपयांपर्यंत सेव्हिंग असणार्‍यांना 8-10 फ्री एटीएम ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत. तर एसबीआयच्या एटीएममधून केलेले सारे व्यवहार हे मोफत आहेत. मात्र इतर बॅंकेच्या एटीममधून पैसे काढल्यास मेट्रो सिटीमध्ये 5 आणि इतर शहरांमध्ये 3 मोफत ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत.