व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा रेल्वेचे लाईव्ह अपडेट,पीएनआर स्टेट्स

सुट्टींच्या दिवसात तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळवणं हे मोठं आव्हानच असतं. अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत त्याची वाट पहावी राहते. सतत पीएनआर स्टेटस चेक करणं हे डोकेदुखीचं काम आहे. पर्यटकांचा हा ताप कमी करण्यासाठी रेल्वेने नुकतीच खास सोय केली आहे. यासाठी रेल्वेने मेक माय ट्रीप (MakeMyTrip) सोबत करार केला आहे.

लाईव्ह स्टेटसची मिळणार माहिती

रेल्वेने केलेल्या नव्या करारानुसार, प्रवाशांना पीएनआर स्टेटस, लाईव्ह ट्रेनचं स्टेटस आणि अन्य अनेक महत्त्वाचे अपडेट्स मिळणार आहेत. हे सआरे अपडेट आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहेत. त्यामुळे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा आता असाही फायदा मिळवण्यासाठी तुमच्याकडे उत्तम इंटरनेट स्पीड आणि व्हॉट्सअ‍ॅपचं लेटेस्ट व्हर्जन असणं आवश्यक आहे.

कसे मिळवाल अपडेट ?

पीएनआर स्टेट्स पाहण्यासाठी स्मार्टफोनमध्ये Dialer हे अ‍ॅप सुरू करा.

तुमच्या मोबाईलमध्ये मेक माय ट्रीपचा ऑफिशिएल नंबर 7349389104 सेव्ह करा.

पीएनआर स्टेटस पाहण्यासाठी पीएनआर क्रमांक एंटर करा.

लाईव्ह ट्रेन स्टेटस तपासण्यासाठी आता तुमच्या ट्रेनचा क्रमांक पाठवा.

मेक माय ट्रीपकडून ट्रेनचे अपडेट व्हॉट्सअ‍ॅपवर बघायला मिळतील.

इतर कुठे पाहू शकाल ट्रेनचं पीएनआर स्टेट्स ?

इंडियन रेल्वेच्या वेबसाईटवर, अ‍ॅपवर, किंवा 139 या क्रमांकावरही तुम्हांला पीएनआर स्टेटस पाहता येऊ शकते.