खासगी क्षेत्रात काम करणारी एचडीएफसी बँक (HDFC Bank) शेतकऱ्यांसाठी एक नवी योजना घेऊन आली आहे. शेतकऱ्यांच्या गरजा ध्यानात घेऊन ही योजना बनविण्यात आली असून, 'हर गाव हमारा टोल फ्री नंबर ' (‘Har Gaon Hamara Toll free Number’) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत एचडीएफसीने एक खास टोल फ्री क्रमांक लॉन्च केला आहे. या फोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मार्गदर्शन आणि इतर फायन्शिअल सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. HDFC Bank Ltd ने सोमवारी (6 जानेवारी 2020) Interactive Voice Response (IVR) टोल फ्री नम्बर (toll free number)(1800 120 9655) जारी केला. या नंबरवर फोन केल्यानंतर शेतकरी आपल्या कृषीविषयक आवश्यकता ध्यानात घेऊन एचडीएफसी बँकेकडून फायन्शिअल योजना घेऊ शकेल.
बँकेच्या या सेवेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत शेतकऱ्याला लिए HDFC Bank च्या 1800 120 9655 या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा लागेल. त्यानंतर शेतकरी आपला परिसरातील पिन कोड क्रमांक (PIN Code Number) टाकावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एचडीएफसी बँकेचा प्रतिनिधी शेतकऱ्याशी संपर्क करेन. हा प्रतिनिधी या शेतकऱ्याची फायन्शिअल गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. (हेही वाचा, पॅनकार्डसाठी अर्ज करताना या चुका टाळा; अन्यथा होईल मोठे नुकसान)
ही योजना गाव, तालुका आणि अगदी छोट्या छोट्या प्रदेशांमध्ये कार्यरत असेन. फायन्शिअल (financial), डिजिटल (digital products) आणि सोशल सिक्योरिटी स्कीम (social security schemes) आदी माध्यमातून तळागाळातील शेतकऱ्याला मदत करण्याचा बँकेचा विचार आहे. बँकेच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दोन तृतियांश जनता खेडोपाड्यात राहते. या जनतेला आर्थिक योजनांचा लाभ म्हणावा त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामळे या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी बँक आपल्या योजनांचा वापर करणार आहे.
प्रामुख्याने Dairy, Poultry, Pisciculture आणि Sericulture आदी प्रकल्पांसाठी बँक शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहोचवणार आहे. सोबतच शेतकऱ्यांना बचत खाते, फिक्स डिपॉजिट यांसह इतर कर्ज प्रक्रियाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे.