HDFC Bank Hike Interest Rate: तुमचे खाते HDFC बँकेत असेल तर ही बातमी तुम्हाच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. बँकेने मंगळवारी सकाळी ई-मेलद्वारे आपल्या ग्राहकांना यासंदर्भात माहिती दिली आहे. खरेतर, सोमवारी संध्याकाळी आणि मंगळवारी सकाळी बँकेच्या ग्राहकांना ई-मेल आला की, बँकेने एफडी दर 5.45 टक्क्यांवरून 6.25 टक्के केला आहे. मात्र, हा 6.25 टक्के व्याजदर काही अटींवरच दिला जाईल. दिवाळीनंतर लगेचच बँकेने व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती. FD च्या नवीन व्याजदरातील (HDFC Bank Interest FD Rate) बदल बँकेने 26 ऑक्टोबर 2022 रोजी लागू केला होता. एचडीएफसी बँकेकडून सांगण्यात आले की, वाढीव व्याजदराचा फायदा 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी असलेल्यांना दिला जाईल. यावेळी व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे.
बँकेने सांगितले की, आज केलेल्या वाढीनंतर, सामान्य ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3 टक्के ते 6.25 टक्के लाभ मिळतील. बँक ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत मुदत ठेव सुविधा प्रदान करते. (हेही वाचा - 7th Pay Commission: खुशखबर! 18 महिन्यांच्या DA थकबाकीसंदर्भात मोठं अपडेट; सरकार 3 हप्त्यांमध्ये देणार 2.18 लाख रुपये? वाचा सविस्तर)
HDFC बँक FD नवीनतम दर -
- 7 ते 14 दिवस - 3%
- 15 ते 29 दिवस - 3%
- 30 ते 45 दिवस – 3.50 टक्के
- 46 ते 60 दिवस – 4%
- 61 ते 89 दिवस – 4.50 टक्के
- 90 दिवस ते 6 महिने – 4.50 टक्के
- 6 महिने 1 दिवस ते 9 महिने – 5.25 टक्के
- 9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 5.50 टक्के
- 1 वर्ष ते 15 महिने – 6.10 टक्के
- 15 महिने ते 18 महिने – 6.15 टक्के
- 18 महिने ते 21 महिने – 6.15 टक्के
- 21 महिने ते 2 वर्षे – 6.15 टक्के
- 2 वर्षे 1 दिवस - 3 वर्षे - 6.25 टक्के
- 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे – 6.25 टक्के
- 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे – 6.20 टक्के
जर आपण ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोलायचे झाले तर या ग्राहकांना सामान्य नागरिकांपेक्षा 50 बेसिस पॉइंट अधिक व्याजाचा लाभ मिळतो. आजच्या वाढीनंतर, ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या FD वर 3.5 टक्के ते 6.95 टक्के व्याजदर मिळेल.