EPFO e-nomination Update: PF युजर्ससाठी महत्त्वाची माहिती; 31 मार्च पर्यंत जरूर करा 'हे' काम अन्यथा होईल आर्थिक नुकसान
PF Account Balance | (Photo Credits: File Imagre)

इपीएफओ (EPFO) कडून आपल्या ग्राहकांना 31 मार्च पर्यंत आपल्या पीएफ अकाऊंटचे ई नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आली आहे. दरम्यान हे नॉमिनेशन पूर्ण न केल्यास ग्राहकांना अनेक सुविधांपासून दूर रहावं लागणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने खातेधारकांसाठी ई-नामांकन प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ईपीएफओ पीएफ खातेधारकांना लवकरात लवकर ई-नामांकन करण्याचं आवाहन आहे. जर खातेदाराने नॉमिनी जोडला नसेल आणि तो कोणत्याही कारणाने मरण पावला तर अशा स्थितीत दाव्याची प्रक्रिया करताना अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत पैसे मिळणे खूप कठीण असते. अंदाजे 7 लाखांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे वेळीच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील स्टेप्स नक्की फॉलो करा. हे देखील नक्की वाचा: EPFO कडून 2021-22 च्या पीएफ वर 8.1% व्याजदर देण्याची शक्यता; सूत्रांची माहिती .

7 लाख विमा संरक्षण

पीएफ खातेधारकांना कर्मचारी पेन्शन योजना आणि EDLI मधून 7 लाखांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळतो. परंतु, तुमच्या खात्यात ई-नामांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच या योजनांचा लाभ घेता येईल.

घरबसल्या ई नॉमिनेशन कसं कराल?

 • epfindia.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
 • 'Service' मधील 'For Employees' वर क्लिक करा.
 • Member UAN/ online Service (OCS/OTP)टॅब वर क्लिक करा.
 • UAN आणि पासवर्ड टाका.
 • 'Manage Tab'वर क्लिक करून 'E- Nomination'निवडा. आता Provide Details च्या टॅब वर क्लिक करा.
 • कुटुंबाची माहिती देण्यासाठी ‘Yes’वर क्लिक करा.
 • 'कौटुंबिक तपशील जोडा' वर क्लिक करा
 • तपशील भरल्यानंतर, 'सेव्ह ईपीएफ नामांकन' वर क्लिक करा.
 • OTP जनरेट करण्यासाठी 'ई-साइन' वर क्लिक करा.
 • आधार कार्डशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
 • OTP सबमिट करा
 • तुमची ई-नामांकन प्रक्रिया पूर्ण होईल.

ज्यांनी अद्याप त्यांच्या पीएफ खात्यात नॉमिनी जोडलेले नाही, त्यांनी हे काम लवकर करावे. हे काम न केल्यास मोठे नुकसान होऊ शकते.