EPFO Interest Rate: कर्मचाऱ्यांना उद्या मिळणार खुशखबर! EPFO 2022-23 आर्थिक वर्षासाठी व्याजदरात ​​वाढ करण्याची शक्यता
EPF | (Photo Credits: PTI)

EPFO Interest Rate: आतापर्यंत ईपीएफओने गेल्या आर्थिक वर्षाचे व्याज दिलेले नाही. काही दिवसांत, हे व्याज तुमच्या EPF खात्यात जमा केले जाऊ शकते. उद्या चालू आर्थिक वर्षाचा व्याजदर निश्चित केला जाणार आहे. यासाठी ईपीएफओच्या बोर्ड सीबीटीची बैठक आजपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू झाली आहे. ही बैठक 28 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे. उद्या ही बैठक संपत असल्याने कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीटीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी व्याजदर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी व्याजदरात कपात करण्यात आली होती. गेल्या आर्थिक वर्षात निश्चित करण्यात आलेला व्याजदर 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर होता.

यावेळी व्याजदर वाढल्यास कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सहा कोटी सक्रिय सदस्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. आर्थिक वर्ष 2022-23 चे व्याजदर लवकरच जाहीर केले जातील. उद्याच्या बैठकीत ही घोषणा होऊ शकते. EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (CBT) 27 आणि 28 मार्च रोजी बैठक होत आहे. दरवर्षी मार्चमध्ये CBT च्या बैठकीत व्याजदर ठरवले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्याजदर आठ टक्क्यांच्या खाली जाण्याची शक्यता नाही. ईपीएफओने गेल्या वर्षी चांगली कमाई केली होती. (हेही वाचा - EPFO Balance By Missed Call: 'या' नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही चेक करू शकता तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक; वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस)

कमाईच्या बाबतीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसाठी (ईपीएफओ) मागील वर्ष खूप चांगले होते. ईपीएफओचे उत्पन्न वाढले आहे. EPFO तुम्हाला या कमाईतूनच गुंतवणुकीवर व्याज देते. यावेळी व्याजदर वाढवण्यामागे अनेक कारणे आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर व्याजदर 10 बेसिस पॉईंटने वाढू शकतात. याचा अर्थ काही व्याज 8.20 टक्के केले जाऊ शकते. तसेच EPFO ​​व्याजदर स्थिर देखील ठेवले जाऊ शकतात.

दरम्यान, EPFO व्याज वाढवण्यामागे बँका देखील एक कारण आहेत. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनीही ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. अनेक बँका यावेळी ठेवींवर नऊ टक्क्यांपर्यंत प्रचंड व्याज देत ​​आहेत. अशातच आता EPFO ​​व्याजदर वाढवेल अशी अपेक्षा आहे.

तथापी, गेल्या वेळी व्याजदर कमी करण्यात आले होते. ते 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के करण्यात आले होते. गेल्या 40 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी 1977-78 मध्ये EPFO ​​ने आठ टक्के व्याज दिले होते. तेव्हापासून व्याजदर 8.25 टक्के किंवा त्याहून अधिक आहे. ईपीएफओनुसार, सध्या पीएफवर व्याज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीएफ सदस्यांच्या खात्यावर लवकरच व्याजाचे पैसे पाठवले जातील. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरकारने सांगितले होते की, सभासदांच्या पीएफ खात्यात व्याज जमा केले जात आहे.